लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे स्थानकावरील फलाट सहावर गाडी आल्यावर प्रवाशांना बाहेर पाडण्यासाठी केवळ एकच तोदेखील अरुंद जिना आहे. त्यामुळे एखादी रेल्वे फलाट सहावर आल्यानंतर विशेषत: पुणे स्थानकावर प्रवास संपणारी जर गाडी असेल तर गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. जिन्यावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी येत असल्याने चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रवासी सुरक्षा धोक्यात येत आहे.
फलाट सहा हा पुणे स्थानकांवरचा सर्वात दुर्लक्षित फलाट आहे. रोज सरासरी आठ गाड्या फलाट सहावर घेतल्या जातात. येथे फारसी प्रवासी सुविधा देखील नाही. या फलाटांवर अरुंद जिना असल्याने प्रवाशांची बाहेर पडण्यासाठी गर्दी होत आहे. विशेषतः डेक्कन क्वीन एक्स्प्रेस सहावर आल्यानंतर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे येथे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे प्रशासनाने यावर वेळीच उपाय योजने गरजेचे आहे.
चौकट
ना लिफ्ट, ना सरकता जिना
पुणे स्थानकांवरील फलाट चार, पाच व सहावर पादचारी पुलावर येण्यासाठी ना लिफ्ट आहे ना सरकता जिना आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला यांना पायऱ्या चढून पुलावर यावे लागते. प्रवाशांनी या याबाबत अनेकदा याची मागणी केली मात्र रेल्वे प्रशासन याबाबत फारसे गंभीर नसल्याने अद्याप फलाटावर लिफ्टची सोय झाली नाही.
कोट : १
फलाट सहावर जर प्रवाशांची गैरसोय होत असेल तर निश्चितच त्याचा फलाट बदलण्यात येईल. याबाबत परिचालन विभागाला सूचना दिल्या जातील. प्रवाशांची अडचण दूर केली जाईल.
सुरेश चंद्र जैन, स्टेशन डायरेक्टर, पुणे स्थानक.
कोट:२ गेल्या अनेक दिवसांपासून डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला दुय्यम वागणूक दिली जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. आधी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस फलाट एकवरूनच सोडली जात आणि घेण्यात येत होती. आता ती सहावर आणली जात आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
फलाट सहावर पूर्वीपासूनच प्रवासी सुविधा नाही. त्यातच ?????????
हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे
सुचना ; बातमीला फोटो आहे.