नसरापुर (पुणे): पर्यटकांचे महाबळेश्वर व भाविकांचे श्रद्धा स्थान श्री बनेश्वर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविधरंगी आकर्षक विविध रंगी फुलांची आरास करण्यात आली तर मंदिराबाहेर विद्युत रोषणाई करून लक्ष लक्ष दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नसरापूर (ता.भोर) येथील श्री बनेश्वर मंदिरातील या शिवालयात विविध रंगांच्या फुलांची नयनरम्य सजावट मंदिराचे सुधीर साळुंखे यांनी कल्पकतेने केली.
पवित्र श्री बनेश्वर महाराजांच्या शिवलिंगाभोवती विविध रंगांच्या फुलांच्या पाकळ्याचा वापर करण्यात आला. श्री बनेश्वर महादेव शिवलिंगाभोवतीच्या प्रशस्त गाभार्यात फुलांची आरास करणे तसेच जिकिरीचे असते. शिवलिंगावर व शिवलिंग भोवती गाभार्यात मंदिराचे गुरव रवींद्र व अतुल हरगुडकर आरास करण्याकरीत मदत केली.
या आकर्षक सजावटीबरोबरच श्री बनेश्वर मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी दिव्यांनी उजळून निघालेले होते. यावेळी पूर्ण मंदिरात पणात्या लावल्या त्याबरोबरच मंदिरातील तळ्यांमध्ये पणत्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. लक्ष लक्ष दिव्यांचा हा दीपोत्सव म्हणजे जणू स्वर्गच पृथ्वीवर उतरला की काय असे क्षणभर वाटायला लागत होते. लाखो दिव्यांनी उजळलेले मंदिर पाहून नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
यावेळी श्री बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिरावर आकर्षक विविधरंगी विद्युत रोषणाई केली होती. यावेळी विश्वस्थ हनुमंत कदम, सुनंदा हरगुडकर, ग्रामस्थ दत्ताभाऊ वाल्हेकर, नंदलाल काजळे, अनिल शेटे, नवनाथ शिर्के, वन विभागाचे कदम श्रीकृष्ण आदींनी व्यवस्था पाहिली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री बनेश्वर मंदिराबाहेरील प्रांगणाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करून बालगोपाळांनी दीपोत्सव साजरा केला.