प्रतिबंधित क्षेत्रातील गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवुन कोणतीही व्यक्ती अत्यावश्यक सेवा वगळून इतर कामासाठी बाहेर येणार नाही किंवा जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव आणि तहसीलदार अजित पाटील यांनी दिले आहेत.त्याची राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप घोरपडे सुरू केली आहे. नागरिकांना १ मे पर्यंत बाहेर जाता किंवा आत येता येणार नाही. नियमांचे काटेकोर पालन न केल्यास अधिक कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले असून चेलाडीफाटा, मेनआळी व कामथडी रस्ता याठिकाणी चेकपोस्ट करून पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो बंदोबस्त ठेवून नसरापूरमध्ये संचारबंदी बरोबर दवाखाना व रुग्णालय वगळून येणारी व जाणारी वाहतूक १ मे पर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.नसरापूरमध्ये सध्या २३ कॉरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण सध्या ६९३ बाधित उपचार घेत आहेत. नसरापूरसह सारोळा ११ संगमनेर २१, वरवे १५, वेळू ११, शिंदेवाडी १७, किकवी १०, कापूरहोळ ११, हातवे ३७ केळवडे १२ या गावामध्ये बाधित संख्या अधिक आहे.
नसरापूर प्रतिबंधितक्षेत्र जाहीर, बाजारपेठ आठ दिवस बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:11 AM