पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीअायअाय) तीन विद्यार्थ्यांच्या लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात अाला अाहे. मन्डे या लघुपटासाठी अरुण कप्पुस्वामी, हॅपी बर्थडे या लघुपटासाठी मेधप्रणव पाेवार तर भर दुपारी या लघुपटासाठी स्वप्निल कापुरे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात अाला. त्याचबराेबर एफटीअायअायचे संचालक भुपेंन्द्र कॅंथाेला यांनाही यावेळी सन्मानित करण्यात अाले. चित्रपट अाणि टेलिव्हिजनचे शिक्षण देणारी एफटीअायअाय ही देशातील नावाजलेली संस्था अाहे. या संस्थेतून अनेक कलाकार चित्रपट सृष्टीला मिळाले अाहेत. या संस्थेची परंपराही माेठी अाहे. यंदा तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये अानंदाचे वातावरण अाहे. अाज पर्यंत अनेक दर्जात्मक कलाकृती एफटीअायअायने तयार केल्या अाहेत. यंदाच्या 65 व्या राष्ट्रीय पुरस्कार साेहळ्यात मन्डे या लघुपटाला स्पेशल ज्युरी अवाॅर्ड व रजत कमल पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले. हॅपी बर्थडे या लघुपटाला काैटुंबिक मुल्यावरील सर्वाेत्तम फिल्म म्हणून रजत कमल पुरस्काराने तर भर दुपार या लघुपटाला विशेष उल्लेखनीय पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले. या पुरस्कारांबाबत बाेलताना भुपेंन्द्र कॅंथाेला म्हणाले, राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही खूप अभिमानाची गाेष्ट अाहे. राष्ट्रीय पुरस्कारमध्ये देशभरातील विविधता पाहायला मिळते. त्याचबराेबर येथे स्पर्धाही माेठी असते. एफटीअायअायमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नेहमीच प्राेत्साहन देण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना नेहमीच वेगळा विचार करण्यास सांगण्यात येते. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक व एफटीअायअायच्या कर्मचाऱ्यांचाही माेठा वाटा अाहे.
एफटीअायअायच्या 3 लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 8:32 PM