डॉ. शिवाजीराव कदम यांनी यूजीसी, एआयसीटीई यांसह विविध राष्ट्रीय संस्थांमधील महत्त्वपूर्ण समित्यांमध्ये काम केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचे सदस्य, भारती विद्यापीठाचे कुलगुरू आणि आता भारती विद्यापीठाचे कुलपती म्हणून डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. तसेच भारती विद्यापीठाला महाराष्ट्रातच नाही तर भारतातील विविध राज्यांमध्ये शिक्षणक्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला.
शिवाजीराव कदम म्हणाले, शिक्षण क्षेत्रात ४० ते ४५ वर्षे रात्रंदिवस काम केले. या केलेल्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला याचा मनस्वी आनंद होत आहे. भारती विद्यापीठातील प्रत्येक लहान मोठ्या घटकाने तसेच शिक्षण क्षेत्रातील व समाजातील अनेक व्यक्तींनी माझ्या शिक्षण क्षेत्रातील प्रवासासाठी मला मदत केली. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून भारती विद्यापीठाला उच्च शिखरावर घेऊन जाण्यास प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.
फोटो - शिवाजीराव कदम