शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
2
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
3
कहरच झाला! साप दोनवेळा डसला म्हणून तरुण त्याला तीनवेळा चावला; साप मेला, तरुण वाचला
4
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
5
PHOTOS : "चमत्कार आणि...", अभिषेक शर्माची 'लकी चार्म', युवा खेळाडूची बहीण डॉक्टर कोमल शर्मा!
6
Budget 2024: अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी मोठी गिफ्ट देणार का सरकार? 'या' ३ घोषणा होण्याची शक्यता
7
इराणमध्ये सत्तांतर! सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला; मसूद पेझेश्कियान नवे राष्ट्रपती
8
"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची गरज काय?"; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांचा सवाल
9
आजपासून सुरू होणारे नीटचे कौन्सिलिंगची स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार
10
काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार
11
मुलीसुद्धा डेटवर जातात, मग एकट्या मुलावर कारवाई कशासाठी? कोर्टाने उपस्थित केला सवाल
12
Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! तपासा तुमच्या शहरातील दर
13
भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?
14
BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार
15
मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
16
पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग
17
"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..."
18
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
19
दर महिन्याला EMI भरावा लागत नाही असं लोन माहितीये का? इमर्जन्सीमध्ये येऊ शकतं कामी
20
"BMCने गैरसमजातून तक्रार केली होती"; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट

Amit Shah: देशात लवकरच राष्ट्रीय ‘सहकार’ विद्यापीठाची स्थापना होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 6:44 PM

सहकाराशिवाय १३० कोटी लाेकांना आत्मनिर्भर बनविणे शक्य नाही. सहकारात काही चुकीच्या गोष्टी घडत आहे. त्यावर आम्ही पायबंद घालणार आहोत.

पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन (वामनीकॉम) संस्थेमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. तीच उत्तम, दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम ठेवावी. देशाची अर्थव्यवस्था लवकरच ५ ट्रिलियन डॉलर होणार आहे. पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यामध्ये मोठे योगदान असेल. देशात लवकरच ‘राष्ट्रीय सहकार’ विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. प्रत्येक राज्यात या विद्यापीठाची एक शाखा असेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात रविवारी केले.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेच्या २७ व्या पदवी बॅचचा तर ५३-५४ व्या पदविका बॅचच्या दीक्षांत समारंभप्रसंगी केंद्रीय सहकार अमित शाह बोलत होते. 

शाह म्हणाले, की पुणे शहर ऐतिहासिक असून देशाच्या शिक्षणाचे माहेरघर आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्वदेश, स्वधर्माचा नारा दिला आहे. तोच नारा घेऊन केंद्र सरकार देशात काम करत आहे. वस्तूत: याआधीच देशात सहकार मंत्रालयाची स्थापना करायला हवी होती. परंतु, ती आम्ही केली. सहकारात मोठी क्षमता असून कामाबरोबर आत्मसन्मान देखील आहे.

सहकारातील चुकीच्या गोष्टींना पायबंद घालणार

सहकाराशिवाय १३० कोटी लाेकांना आत्मनिर्भर बनविणे शक्य नाही. सहकारात काही चुकीच्या गोष्टी घडत आहे. त्यावर आम्ही पायबंद घालणार आहोत. त्यासाठी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह ॲक्ट, प्रायमरी ॲग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी (पॅक्स) या तसेच इतर काही ॲक्टमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. सुरूवातीला सर्व सहकारी बँका संगणकीकरणातून जिल्हा बँकांना जोडणार त्यानंतर नाबार्डबरोबर जोडून पारदर्शकपणा आणणार आहे. गावागावात सहकार पोहोचवला जाणार आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे, असे मत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

पुण्यातच होणार राष्ट्रीय सहकार विद्यापीठ ?

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन (वामनीकॉम) संस्थेचा परिसर मोठा आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार नवीन विद्यापीठासाठी किमान १० एकर जागा हवी असते. पुणे विद्यापीठाच्या बाजूला वामनीकॉमची १५ एकराची जागा आहे. तसेच सभागृह, निवास व्यवस्थांसह इतर सर्व सोयीसुविधा आधीपासून तयार आहेत. सहकारमंत्री अमित शाह यांच्याबरोबर विद्यापीठ स्थापन करण्याबाबत यापूर्वीच बोलणी झाली आहे. याबाबत ते लवकरच घोषणा करणार आहेत, अशी माहिती सहकार तज्ज्ञ तथा दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लि.चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी याप्रसंगी सांगितले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालय