शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

लोकनृत्यातून राष्ट्रीय एकात्मता

By admin | Published: January 05, 2015 11:17 PM

बेळगाव येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान फैयाज यांच्यासारख्या गुणी महिला कलावंताला मिळाला आहे.

पुणे : बेळगाव येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान फैयाज यांच्यासारख्या गुणी महिला कलावंताला मिळाला आहे. यानिमित्ताने त्यांचा जीवनपट उलगडणारा रंगमंचीय अविष्कार आणि देशातील सर्व लोकनृत्यांच्या सादरीकरणातून राट्रीय एकात्मकतेचे दर्शन घडविणारा कलात्मक कार्यक्रम अशी दोन यंदाच्या नाट्य संमेलनाची प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. संमेलनाच्या इतिहासात एखाद्या संमेलनाध्यक्षाच्या कार्याची नोंद आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून होेण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद हा रंगकर्मींचा सन्मान असल्याने बिनविरोध पद्धतीने या पदावर रंगकर्मींची निवड केली जाते. यंदा उत्तम अभिनेत्री, गायिका अशी ओळख असलेल्या फैयाज यांची संमेलनाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. संमेलनाच्या व्यासपीठावरच संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याची आगळीवेगळी कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे बेळगाव नाट्य परिषदेने ठरविले असून, त्यातूनच हा अभिनव प्रयोग आकाराला येत आहे. नृत्य कलावंत आणि रंगकर्मी आसावरी भोकरे यांच्या संकल्पनेतून रंगमंचीय अविष्काराची निर्मिती केली जात आहे. फैयाज यांच्या लहानपणापासून ते नाट्य क्षेत्रापर्यंत झालेला प्रवास, काही वैयक्तिक आठवणींचा कप्पा कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. संत गोरा कुंभार, गुंतता हदय हे, संगीत संशयकल्लोळ, कट्यार काळजात घुसली, संगीत मत्स्यगंधा, वीज म्हणाली धरतीला या सहा नाटकांमधील निवडक प्रवेश, त्यांच्या जीवनप्रवासाचे निवेदन, आठवणी व किस्से यांचा चित्रफितीमध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)नाट्य संमेलनामध्ये माझा जीवनपट मांडण्यात येणार आहे,याविषयी मी देखील ऐकले आहे.भोकरे या नृत्यांगना आहे,पण माझी गाणी ही नृत्य्यावर आधारित नाहीत. त्यामुळे हा रंगमंचीय अविष्कार कशा स्वरूपात असेल याबाबत मलाही उत्सुकता आहे - फैयाज