करोना काळात न्यायालयातील प्रकरणांची संख्या मोठी वाढली आहे. डिसेंबर २०२० नंतर प्रथमच म्हणजे सात महिन्यांनंतर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाने राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. खेड वकील बार असोसिएशन, विधी सेवा समिती यांच्या माध्यमातून या लोकअदालतचे नियोजन करण्यात आले आहे.
लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणामध्ये तडजोडीसाठी ‘व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंग’चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे जे पक्षकार आजारी, वृद्ध किंवा अन्य अपरिहार्य कारणास्तव प्रत्यक्ष हजर राहू शकत नसतील त्यांनी ‘व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलिंग’चा या उपयोग करून या प्रकरणामध्ये तडजोड करावी. या अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणांत तडजोड करावी, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.