पुणे: पुण्यात भाजप युवा मोर्चाद्वारे आयोजित 'हर घर तिरंगा' कार्यक्रमाअंतर्गत विविध ठिकाणी सभा घेण्यात येत आहेत. यासंबंधीची एक सभा मॉडर्न कॉलेजमध्ये घेण्यात आली. त्यावेळी भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) योगदान काय असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. असा प्रश्न विचारणाऱ्यांना भाजप युवा मोर्चाकडून विशेष वर्ग भरवला जाईल व त्यामध्ये इतिहास सांगून त्यांच्या ज्ञानात भर घातली जाईल. भारतच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये सर्वांचे योगदान आहे.
सूर्या पुढे म्हणाले, सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात एकात्मता रहावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी हर घर तिरंगा हा उपक्रम महत्त्वाचा आहे. पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळगंगाधर टिळक यांची भूमी आहे. या पवित्र भूमीत आपल्याला हर घर तिरंगा फडकवायचा आहे.
जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर भारतीय तिरंगी ध्वजाचा मान वाढला आहे. 30 वर्षानंतर लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा मान मिळाला आहे, असं वक्तव्य तेजस्वी सुर्या यांनी केले.