शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
2
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
3
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
4
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
5
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
6
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
7
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
8
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
9
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
10
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
11
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
12
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
13
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
14
Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट
15
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ
16
तुम्ही लढत बसाल, वकील खुश होतील; घटस्फोटाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश काय बोलले?
17
"आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत PM मोदींना विनाकारण ओढलं, प्रार्थना करतो की...'; शाह यांचा खर्गेंवर पलटवार
18
नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले
19
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
20
अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?

‘कर्मयोगी’च्या पंचवार्षिक निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार; भाजपला उमेदवारी देताना कसोटी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 6:36 PM

शेतकऱ्यांच्या दृष्टीने कर्मयोगी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याची उत्सुकता सभासदांना होती

ठळक मुद्देकारखाना हा राजकारणाचे माध्यम नसून गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रपंच चालविण्याचे साधनकारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे गरजेचे

कळस : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेऊन पळ काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाराजी वाढली असून भाजपला उमेदवारी देताना कसोटी लागणार आहे.

राज्यातील महत्त्वाचा सहकारी साखर कारखाना व अनेक उपपदार्थ निर्मिती असलेल्या या कारखान्यात राष्ट्रवादीचे विद्यमान मंत्री व आमदार पक्षाचा असताना निवडणुकीतून माघारी घेणे धक्कादायक समजले जात आहे. माजी मंत्री पाटील यांच्यावर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातील नेत्यांनी या निवडणुकीतून पळ काढला आहे. पहिल्या फळीतील नेते निवडणूक लढविण्यास तयार नसल्याने हा निर्णय झाला असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ग्रामपंचायत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक मात्र कर्मयोगी साखर कारखान्याची निवडणुकीपासून का पळ काढला आहे आहेत. हा मोठा प्रश्न आहे. कर्मयोगी साखर कारखान्यात स्वर्गीय शंकरराव पाटील यांचे मोठे योगदान राहीले आहे. त्यानंतर माजी मंत्री पाटील यांनी कारखान्याची धुरा सांभाळली.

कर्मयोगी साखर कारखान्याबरोबरच माजी मंत्री पाटील यांनी दुसऱ्या सहकारी तत्वावरील निरा भिमा कारखाना सुरू केला. त्या ठिकाणी मागील सहा महिन्यात निवडणुक बिनविरोध पार पाडली. त्या ठिकाणीही राष्ट्रवादीने पळ काढला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने कर्मयोगी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याची उत्सुकता सभासदांना होती. मात्र  राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

कारखाना निवडणूक लढवली तरी कारखान्याचा कारभार चांगल्या पद्धतीने करता येईल, अशी स्थिती नाही सहकार क्षेत्रातील अनुभवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. मात्र जाणीवपूर्वक सदस्यत्व रद्द करून उमेदवारीपासून कायेदशीररित्या दूर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे अनुभव नसलेल्या उमेदवारांचा पॅनल उभा करून फक्त राजकारणासाठी राजकारण करणे आम्हाला योग्य वाटत नाही. कारखाना हा राजकारणाचे माध्यम नसून गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रपंच चालविण्याचे साधन आहे.

कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. याचा विचार करून सदर निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वत:चे पॅनल उभे करणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतलेला आहे, असे स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकाव्दारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिले आहे. निरा भिमा साखर कारखान्यानंतर कर्मयोगी साखर कारखान्यात राष्ट्रवादीने पळ काढल्याने आगामी जिल्हा बँक, नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीत त्याचा परिणाम होणार आहे. यासाठी राष्ट्रवादीत अंतर्गत कलह कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :DhanoriधानोरीPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसSugar factoryसाखर कारखाने