बारामती: देऊळगाव (ता. दौंड) येथे बारामती कृषी विज्ञान केंद्र व टेस्टी बाईट फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना ‘एकात्मिक शेती व्यवस्थापन’ या प्रकल्पांतर्गत मूलस्थानी जलसंधारणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे प्रमुख डॉ. रतन जाधव यांनी मूलस्थानी जलसंधारण व रब्बी ज्वारीसाठी पंचसूत्री लागवड तंत्रज्ञान याविषयी महिती दिली. येथील भाऊसाहेब जगताप यांच्या शेतामध्ये १० बाय १० मीटर चे गादी वाफे तयार करून मूलस्थानी जलसंधारणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच मूरघास तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर रब्बी ज्वारीचे पंचसूत्री लागवड तंत्रज्ञान व जमिनीच्या प्रकार नुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी रब्बी हंगामास शिफारस केलेल्या ज्वारीच्या जिरायत जमिनीसाठी 'फुले अनुराधा' वाण आणि मध्यम जमिनीसाठी 'फुले सुचित्रा' या वाण विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वाणांचे बियाणे पुरवठा प्रात्यक्षिकासाठी करण्यात आला. या वेळी देऊळगावमधील ४२ शेतकरी उपस्थित होते. तसेच देऊळगावचे सरपंच विशाल बारवकर व ग्रामपंचायत सदस्य राजवर्धन जगताप, भाऊसाहेब शितोळे व अक्षय बारवकर उपस्थित होते.
देऊळगाव येथे मूलस्थानी जलसंधारणांतर्गत शेतकऱ्यांना गादीवाफ्याचे प्रात्यक्षिक बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दाखवण्यात आले.
१२०९२०२१-बारामती-०४