Narendra Modi Pune Visit ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर येणाऱ्या मोदींनी आपला दौरा रद्द केला आहे, यावरुन आता काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसामुळे निर्णय!
काँग्रेस नेते मोहन जोशी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुणेकरांसाठी नव्हता. हा दौरा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन होता. म्हणून काँग्रेसकडून आम्ही आंदोलन करणार होतो, तशा आशयाच्या नोटीस आम्ही पोलिसांना आणि प्रशासनाला दिल्या आहेत. आमच एकत म्हणणे आहे. २०१६ मध्ये पुण्यात मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन झाले होते. आता आठ वर्षानंतर पंतप्रधान मोदी प्रत्येक स्टेशनच्या उद्घाटनाला येतात. आमचा विरोध त्यांना यापुढेही असणार आहे, असंही जोशी म्हणाले.
"राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने टीका करतात. याबाबत भाजपाने त्यांच्या नेत्यांवर कारवाई केलेली नाही, असंही जोशी म्हणाले. आता निसर्गालाही हा भारतीय जनता पार्टीचा, नरेंद्र मोदींचा हा राजकीय दौरा पसंत नव्हता म्हणून निसर्गाने पुणकरांना आणि विरोधकांना साथ दिली, असा टोलाही मोहन जोशी यांनी लगावला. 'गेल्या चार दिवसापासून प्रशासकीय यंत्रणा हे कामात होते. एसपी कॉलेजच्या मैदानावर ही सभा होणार होती, सरकारच्या खर्चाने आज भारतीय जनता पार्टी विधानसभेची सभेच्या निवडणुकीचा शुभारंभ करणार होता, असा आरोपही जोशी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर येणाऱ्या मोदींनी आपला दौरा रद्द केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रोच्या स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होते. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार होती. तसंच ते भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी करणार होते. मात्र पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.