पुणो : नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या भेलके पती-पत्नींना चंद्रपूर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तामध्ये मंगळवारी ताब्यात घेतले. चंद्रपूर येथे पोहचल्यानंतर दोघांना 24 तासाच्या आत हजर करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत.
अरुण भानुदास भेलके व त्याची पत्नी कांचन या दोघांना
पुणो दहशतवादविरोधी पथकाने नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असल्याप्रकरणी 2 सप्टेंबर रोजी अटक केली होती.
या दाम्पत्याकडून नक्षलवादी विचारसरणीचे साहित्य व
महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
या आधी चंद्रपूर पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली होती. त्यांच्याकडून कार्बाइन व 13क् राऊंड जप्त केले होते.
मात्र याप्रकरणी दोघे जामीनावर बाहेर आल्यानंतर ते पसार झाले होते. त्यानंतर ते पुणो जिल्हयातील कान्हेफाटा येथे राहत होते. एटीएसला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या दोघांना तेथून अटक केली होती. सध्या दोघे न्यायालयीन कोठडीमध्ये होते. (प्रतिनिधी)