पुणे : माअाेवाद्यांशी संबंध असल्याचा अाराेपावरुन नजरकैदेत असलेल्या व्हर्णन गाेन्सालवीस अाणि अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात अाल्याने पुणे पाेलिसांनी त्यांना पुन्हा मुंबईतून अटक केली अाहे. त्यांना अाज पुण्यातील शिवाजीनगर काेर्टात हजर करण्यात अाले असून सुनावणीला सुरुवात झाली अाहे.
शुक्रवारी विशेष न्यायाधीश के. ढी. वढणे यांनी दाेघांचा जामीनाचा अर्ज फेटाळून लावला हाेता. जामीन फेटाळल्या प्रकरणी अाराेपींचे वकील सिद्धार्थ पाटील अाणि अॅड राहुल देशमुख यांनी या निकालाच्या विराेधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले हाेते. तसेच त्यांच्या नजरकैदेत एक अाठवड्याची वाढ करण्यात यावी, असा अर्ज केल्याची माहिती त्यांनी दिली हाेती. मात्र उच्च न्यायालयात जाण्याच्या अाधीच दाेघांनाही पुन्हा अटक करण्यात अाली अाहे. सुधा भारद्वाज यांना देखील अटक हाेणार असल्याची शक्यता अाहे. दाेन्ही अाराेपींना अटक करण्यासाठी टीम तयार केल्या हाेत्या. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात अाले असून अाज काेर्टात हजर करण्यात अाले अाहे.
अाज काेर्टात काय सुनावणी हाेते, तसेच दाेन्ही अाराेपींचा जामीन मंजूर हाेताे की काेर्ट पाेलीस काेठडी सुनावते याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.