शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
5
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
6
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
7
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
8
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
9
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
10
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
11
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
12
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
13
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
14
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
15
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
16
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
17
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
18
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
19
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
20
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?

विजेच्या लपंडावामुळे नायगावचे ग्रामस्थ त्रस्त

By admin | Published: July 09, 2015 2:02 AM

पूर्व पुरंदरमधील नायगावच्या गावठाणातील ग्रामस्थ गेल्या तीन महिन्यांपासून विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहेत.

सासवड : पूर्व पुरंदरमधील नायगावच्या गावठाणातील ग्रामस्थ गेल्या तीन महिन्यांपासून विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहेत. आर्थिंगचे साहित्य नाही, या कारणाखाली तीन महिन्यांपासून विद्युत विभागाच्या बारामती येथील ठेकेदाराने मंजूर झालेल्या रोहित्राचे काम अर्धवट ठेवले असल्याने ग्रामस्थ आता संतापले आहेत. दोन दिवसांत काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बेलसर-माळशिरस गटाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख किशोर खळदकर यांनी दिला आहे. नायगावच्या गावठाणासाठी एसटी स्थानकाजवळ रोहित्र आहे. मात्र, या रोहित्रावर जास्त दाब येत असल्याने वारंवार फ्युज जाण्याचे प्रकार होतात. येथील सिंगल फ्युजचे डबे खराब आहेत. त्यामुळे फ्युज टिकत नाहीत व प्रत्येकवेळी गावातील युवक रात्रीच्या वेळीही जीव धोक्यात घालून फ्युज व डीओ टाकणे अशी कामे करतात. मात्र, जास्त दाबामुळे फ्युज जातात. यासाठी पर्याय व या रोहित्रावरील जादा दाब कमी होण्यासाठी गावठाणातच दुसरे रोहित्र मंजूर केले आहे. बारामती येथील एका ठेकेदाराकडे रोहित्राचे काम देण्यात आले आहे. (वार्ताहर)