पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराच्या संघटनेमध्ये विविध सेलमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. त्यात महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांचाही समावेश असून त्यांच्या जागी स्वाती पोकळे यांना संधी देण्यात आली आहे. पुणे शहरामध्ये राष्ट्रवादीचे महिला, युवक, विद्यार्थी, युवती ,अल्पसंख्यांक ,कामगार अशा विविध संघटना व सेल आहेत. या संघटनाच्या अध्यक्षांच्या पक्षाच्यावतीने आज नवीन नेमणुका करण्यात आल्याची घोषणा शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली.आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शहराच्या संघटनेमध्ये रचनात्मक बदल केल्याचे जाणवत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या नेमणुका करण्यात आल्याचे समजते. या नेमणुका करत असताना पूर्वीच्या संघटनेच्या व सेलच्या शहराध्यक्ष यांना विभागाच्या प्रदेश कार्यकारीणी मध्ये प्रमोशन देण्यात आले आहे. तसेच काही लोकांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये बढती देण्यात आली. त्यामुळे पूर्वीच्या संघटनेच्या शहराध्यक्षांचा केलेल्या कामाचा अनुभवाचा उपयोग महाराष्ट्र प्रदेश पातळीवर पक्षाला होईल व नवीन चेहऱ्यामुळे संघटना बांधणी अधिक मजबूत करता येईल असे मत शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी व्यक्त केले. नवनिर्वाचित अध्यक्षांची नावे पुढील प्रमाणे
- राष्ट्रवादी महिला काँग्रेस : स्वाती पोकळे
- राष्ट्रवादी युवक काँग्रेस : महेश हांडे
- राष्ट्रवादी विद्यार्थी : विशाल मोरे
- राष्ट्रवादी युवती काँग्रेस : अश्विनी परेरा
- राष्ट्रवादी अल्पसंख्यांक :अजीम गुडाकुवाला
- राष्ट्रवादी कांग्रेस कामगार सेल : राजेंद्र कोंडे
- राष्ट्रवादी काँग्रेस पर्यावरण सेल :समीर निकम
- राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल : प्रमोद रणवरे
- राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेल :ययाती चरवड
- राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेल : शंकर शिंदे
- राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेल :सुकेश पासलकर
- राष्ट्रवादी काँग्रेस पथारी सेल : अल्ताफ शेख