बारामती : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दरवाढ कमी करण्यासंदर्भात शनिवारी (दि. ३) बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात केंद्र सरकारने जनतेला खोटी आश्वासने व भूलथापा मारून गेल्या ७ वर्षांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावली आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवून सर्वसामान्य जनतेचे जीवन आर्थिकदृष्ट्या हतबल केले आहे. सामान्य गोरगरीब जनतेशी असंवेदनशीलपणे वागणाऱ्या केंद्र सरकारचा या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढ त्वरित कमी करावी, या मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले.
इंधन दरवाढीच्या विरोधात दादासाहेब कांबळे यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.
०४०७२०२१-बारामती-०२