'कट कट कट' डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 09:11 PM2024-09-02T21:11:00+5:302024-09-02T21:13:28+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला.

ncp dcm ajit pawar angry in jan sanman yatra baramati | 'कट कट कट' डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवारांचा संताप

'कट कट कट' डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवारांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्क, बारामतीबदलापुर,पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या घटना होता कामा नयेत.महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्य प्राधान्य दिले जाइल.यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.महिला मुलींच्या केसाला देखील धक्का लागता कामा नये.माणुसकीला काळीमा फासणार्या निर्दयी नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.फाशी द्यायला वेळ लागतो. मात्र फाशी होईपर्यंत असा बंदोबस्त करायचा की, पुन्हा त्याला तसं करताच आलं नाही पाहिजे. 'कट कट कट' डायरेक्ट कटिंग करून टाकायची. याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत. अशा  शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला.

बारामती येथे जनसन्मान यात्रेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  महिला अत्याचारांच्या घटनाबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा सन्मान कसा केला जातो. हे आपण इतिहासात पाहिले आहे. आज महिलांवर जे अत्याचार होत आहेत. तो अक्षम्य गुन्हा आहे. त्यात कोणालाही माफी नाही. कोणालाही सोडले जाणार नाही. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.  महिलांवर अत्याचार करणारी माणसे असलीच नाही पाहिजे,असे पवार म्हणाले.

बारामतीत पोलीस खात्याचा आदरयुक्त दबदबा असला पाहिजे.समाजातील महिला, मुलींना कोणी त्रास देत असेल तो कितीही मोठ्या बापाचा असो.तो कोणीही असो,त्याचा अजिबात त्याचा लाड चालणार नाही. पालकांनो तुम्हीही आपल्या मुलांना नीट समजवा. महिला मुलींची छेड काढू नका. दादांनी पोलिसांना 'टाईट' केले आहे.टाईट केल आहे म्हणजे. महिला मुलींची कोणी छेड काढत असेल तर तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असू द्या.त्याला सोडायचं नाही कायदा सर्वांना सारखा आहे.बारामतीत पाेलीसांनी खासगी ड्रेस घालत सबंधितांवर नजर ठेवावी.आम्ही खर्याच्या पाठीशी आहोत,वेड्यावाकड्याच्या पाठीशी नाही.बारामतीत दोन नंबरचे धंदे देखील होता कामा नयेत,असा सज्जड दम देखील पवार यांनी पोलीस प्रशासनाला दिला.त्यासाठी पोलीसांना  आवश्यक सुविधा पुरवु,असे पवार म्हणाले.

...पवारांनी काढली सावंत फाैजदारांची आठवण

महिलांवरील अन्यायाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पुर्वी होवून गेलेल्या ‘सावंत फाैजदार’ यांची आठवण काढली.पवार म्हणाले,कायदा सर्वांना सारखा आहे,आजिबात हयगय करु नका.पुर्वी बारामतीत सावंत फाैजदार होते.ते मोटरसायकलवर चालले तरी लोक इकडेतिकडे पळुन जायचे.एवढा त्यांचा दरारा होता.त्यांच्यावर चित्रपट निघाला होता,तशा पध्दतीने वागा,अशा शब्दात पवार यांनी पोलीसांना इशारा दिला.

...वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘सर्व्हिस’ बाबत पवारांकडे तक्रार

बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेबाबत पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश गोफणे तसेच अविनाश देवकाते यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.या पार्श्वभुमीवर पवार  यांनी या तक्रारीबाबत भाषणात उल्लेख केला.‘तिथे सर्व्हीस बरोबर दिली जात नाही,ही  दोघांनी तक्रार केली आहे.या बाबत आपण लक्ष घालणार आहोत.माझ्या मायमाऊलींना दिलेल्या सुविधा मिळत नसतील,तर माझ्या कानावर घाला,त्यात दुरुस्ती करु,असे पवार म्हणाले.

Web Title: ncp dcm ajit pawar angry in jan sanman yatra baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.