शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

'कट कट कट' डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 9:11 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, बारामतीबदलापुर,पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या घटना होता कामा नयेत.महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्य प्राधान्य दिले जाइल.यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.महिला मुलींच्या केसाला देखील धक्का लागता कामा नये.माणुसकीला काळीमा फासणार्या निर्दयी नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.फाशी द्यायला वेळ लागतो. मात्र फाशी होईपर्यंत असा बंदोबस्त करायचा की, पुन्हा त्याला तसं करताच आलं नाही पाहिजे. 'कट कट कट' डायरेक्ट कटिंग करून टाकायची. याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत. अशा  शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला.

बारामती येथे जनसन्मान यात्रेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  महिला अत्याचारांच्या घटनाबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा सन्मान कसा केला जातो. हे आपण इतिहासात पाहिले आहे. आज महिलांवर जे अत्याचार होत आहेत. तो अक्षम्य गुन्हा आहे. त्यात कोणालाही माफी नाही. कोणालाही सोडले जाणार नाही. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.  महिलांवर अत्याचार करणारी माणसे असलीच नाही पाहिजे,असे पवार म्हणाले.

बारामतीत पोलीस खात्याचा आदरयुक्त दबदबा असला पाहिजे.समाजातील महिला, मुलींना कोणी त्रास देत असेल तो कितीही मोठ्या बापाचा असो.तो कोणीही असो,त्याचा अजिबात त्याचा लाड चालणार नाही. पालकांनो तुम्हीही आपल्या मुलांना नीट समजवा. महिला मुलींची छेड काढू नका. दादांनी पोलिसांना 'टाईट' केले आहे.टाईट केल आहे म्हणजे. महिला मुलींची कोणी छेड काढत असेल तर तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असू द्या.त्याला सोडायचं नाही कायदा सर्वांना सारखा आहे.बारामतीत पाेलीसांनी खासगी ड्रेस घालत सबंधितांवर नजर ठेवावी.आम्ही खर्याच्या पाठीशी आहोत,वेड्यावाकड्याच्या पाठीशी नाही.बारामतीत दोन नंबरचे धंदे देखील होता कामा नयेत,असा सज्जड दम देखील पवार यांनी पोलीस प्रशासनाला दिला.त्यासाठी पोलीसांना  आवश्यक सुविधा पुरवु,असे पवार म्हणाले....पवारांनी काढली सावंत फाैजदारांची आठवण

महिलांवरील अन्यायाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पुर्वी होवून गेलेल्या ‘सावंत फाैजदार’ यांची आठवण काढली.पवार म्हणाले,कायदा सर्वांना सारखा आहे,आजिबात हयगय करु नका.पुर्वी बारामतीत सावंत फाैजदार होते.ते मोटरसायकलवर चालले तरी लोक इकडेतिकडे पळुन जायचे.एवढा त्यांचा दरारा होता.त्यांच्यावर चित्रपट निघाला होता,तशा पध्दतीने वागा,अशा शब्दात पवार यांनी पोलीसांना इशारा दिला....वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘सर्व्हिस’ बाबत पवारांकडे तक्रार

बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेबाबत पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश गोफणे तसेच अविनाश देवकाते यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.या पार्श्वभुमीवर पवार  यांनी या तक्रारीबाबत भाषणात उल्लेख केला.‘तिथे सर्व्हीस बरोबर दिली जात नाही,ही  दोघांनी तक्रार केली आहे.या बाबत आपण लक्ष घालणार आहोत.माझ्या मायमाऊलींना दिलेल्या सुविधा मिळत नसतील,तर माझ्या कानावर घाला,त्यात दुरुस्ती करु,असे पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीbaramati-acबारामतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४