सोमेश्वरनगर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी व पणदरे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक अत्यंत चुरशीची ठरली. पणदरेत माळेगावचे माजी चेअरमन तानाजी कोकरे यांच्या पॅनेलने सरपंचपदाची बाजी मारली, मात्र सत्यजित जगताप व विक्रम कोकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उभ्या केलेल्या पॅनेलला गावकऱ्यांनी मोठी साथ दिल्याने त्यांच्या गटाचे ८ उमेदवार विजयी झाले. तर तानाजी कोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ७ जागा व सरपंचपदाची जागा अजित सोनवणे यांनी जिंकली. पळशी ग्रामपंचायतीत जिल्हा परीषदेचे माजी सभापती भाऊसाहेब करे व माजी उपसरपंच माणिक काळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तानाजी कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. सरपंचपदाच्या जागेसह १० पैकी १० जागा जिंकून एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले. कुरणेवाडी गावात बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांना मोठा धक्का बसला असून कुरणेवाडी काळभोर गटाने ६ विरूध्द २ जागांनी संदिप जगताप यांना काळभोर गटाने धक्का दिला आहे. हनुमंत काळभोर व सूर्यकांत काळभोर यांनी जगताप यांनी जगताप गटाला कडवे आव्हान दिल्याने गावच्या सरपंचपदी आशा किसन काळभोर या निवडून आल्या आहेत. येथे वारूळबाबा स्वाभिमान पॅनेलने बाजी मारली आहे.
गडदरवाडीत सतिश काकडे, प्रमोद काकडे व सोमेश्वरचे संचालक अभिजित काकडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री सोमेश्वर ग्रामविकास पॅनेलने बाजी मारत सरपंचपदासह सर्व जागा जिंकल्या आहेत. येथे सोमेश्वरचे संचालक शैलेश रासकर व लक्ष्मण गोफणे यांच्या पॅनेलचा येथे पराभव झाला आहे. वाणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या उमेदवार गीतांजली दिग्विजय जगताप यांनी गाव पॅनेलला धक्का देत अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. गाव पॅनेल असलेला हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार विद्या भोसले यांचा पराभव झाला आहे. मुरूम येथे नंदकुमार शिंगटे हे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर १३ पैकी ७ उमेदवार निवडून आले आहेत.
सरपंचपदी निवडुन आलेले ग्रामपंचायत निहाय उमेदवार
बारामती तालुका
१)वाणेवाडी ग्रामपंचायत - गीतांजली जगताप२)कुरणेवाडी - आशा किसन काळभोर३)मुरुम - संजयकुमार नामदेव शिंगटे४)पणदरे - अजय कृष्णा सोनवणे५)लोणी भापकर - गीतांजली रविंद्र भापकर६)सोरटेवाडी - भारती अनिरुध्द सोरटे७)वाघळवाडी - हेमंत विलास गायकवाड८)मोरगांव - अलका पोपट तावरे९)पळशी - काळे ताई१०)गडदरवाडी - मालन पांडुरंग गडदरे११)मासाळवाडी - मुरलीधर किसन ठोंबरे१२)काऱ्हाटी - दिपाली योगेश लोणकर१३)सोनकसवाडी—राणी सतीश कोकरे.