केडगाव : दौंड येथील दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या १७ पैकी १६ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने संघावरती विजय मिळवला आहे. भाजपाचे वरवंड येथील सचिन सातपुते यांनी ८ पैकी ५ मते मिळवत राष्ट्रवादीचे संजय धायगुडे यांचा पराभव केला आहे. ही जागा जिंकत भाजपने संघामध्ये चंचूप्रवेश केला आहे. पाटस गटामध्ये शिवाजी ढमाले यांना १२ मते भाजपच्या रंजना भागवत यांना ६ मते मिळाली आहेत. या गटामध्ये ढमाले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
पिंपळगाव गटामध्ये झालेल्या १२ मतदानापैकी राष्ट्रवादीचे मोहन रामचंद्र टुले ७ विरुद्ध राष्ट्रवादीचे अपक्ष नारायण रामचंद्र जगताप ५ मते मिळाली आहेत. टुले यांचा २ मतांनी विजयी झाला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी जगताप यांनी टुले यांना पाठिंबा दिला होता. या गटामध्ये जगताप यांना भाजपने ३ मते पारड्यात पडली. जगताप यांना अतिरिक्त २ मते कशी मिळाली? याबाबत विचार मंथन सुरू आहे. विजयी उमेदवारांचे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार रमेश थोरात, आप्पासाहेब पवार यांनी अभिनंदन केले. मतदानापुर्वीच राष्ट्रवादीचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
राष्ट्रवादीचे बिनविरोध संचालक पुढीलप्रमाणे-
बिनविरोध उमेदवार -सदानंद वामन दोरगे( यवत)विजय पंढरीनाथ नागवडे(खामगाव) ज्ञानेश्वर साहेबराव शेळके (केडगाव) नानासो गुलाबराव जेधे (पारगाव)विश्वास राजाराम भोसले (नानगाव)जयवंत रामचंद्र गिरीमकर (दौंड)गजानन नारायण गुणवरे (रावण गाव) वैयक्तिक प्रतिनिधी प्रेमनाथ बबन दिवेकर, पुरुषोत्तम बाळासो हंबीर महिला प्रतिनिधी, सविता आप्पासो ताडगे, नंदा दत्तात्रय ताकवणे, संपत मारुती शेलार, आश्रु सोमा डुबे, विकास कांबळे.