'तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेऊ पाहताय?'; अमोल कोल्हेंचा ओवैसींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 09:59 PM2022-05-12T21:59:47+5:302022-05-12T22:00:10+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल कोल्हे यांनी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसींवर टीका केली आहे.

NCP leader Amol Kolhe has criticized MIM leader Akbaruddin Owaisi | 'तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेऊ पाहताय?'; अमोल कोल्हेंचा ओवैसींना सवाल

'तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेऊ पाहताय?'; अमोल कोल्हेंचा ओवैसींना सवाल

googlenewsNext

पुणे- एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी आज दुपारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आजवर कोणीच या कबरीचे दर्शन घेतले नाही, मात्र एमआयएमच्या नेत्यांनी दर्शन घेऊन नवीन राजकारणाची पद्धत रूढ करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल कोल्हे यांनी देखील अकबरुद्दीन ओवैसींवर टीकास्त्र सोडलं आहे. 

अमोल कोल्हे म्हणाले की, ज्या औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांचे हाल केले. ज्याने सख्ख्या भावंडांची कत्तल केली. त्या माणसाचं उदात्तीकरण करून तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेऊ पाहताय.'' पुण्यात जश्न-ए ईद ए मिलन या राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा पार पडला. त्यावेळी अमोल कोल्हे म्हणाले. 

खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतात असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावरुन कोणताही वाद निर्माण करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच  एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचं दर्शन घेतल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं. 

कुत्रे भुंकत आहेत, भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या. कुत्रे भुंकत असतात. पण, वाघ शांतपणे निघून जात असतो. ते जाळं विणत आहेत, तुम्ही त्यात फसायचं नाही. आपण कायदा हातात घ्यायचा नाही, असं एमआयएमचे आमदार आणि नेते अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले. त्यांनी आज औरंगाबादमधील जनेतला संबोधित केले. आपल्या भाषणाच्या शेवटी हिंदुस्तान झिंदाबाद असे म्हणत, हा देश जेवढा तुमचा आहे, तेवढाच आमचाही आहे असं त्यांनी सांगितले. या देशात आपण प्रेमानं राहूयात, असेही अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले.

दरम्यान, अजानचा विषय आहे, मॉब लिंचींगचा आहे, हिबाजचा विषय आहे. मात्र, आम्ही कुणालाही घाबरत नाही. औरंगाबाद ही अल्लाहची सरजमीन आहे. जर वेळच आली तर, जीवाची बाजी लावू आणि मरणाऱ्यांच्या यादीत सर्वात पुढे अकबरुद्दीन ओवैसी असेल, असे म्हणत औरंगाबादमधील जनतेला न घाबरण्याचे आवाहन औवेसी यांनी केलं.

Web Title: NCP leader Amol Kolhe has criticized MIM leader Akbaruddin Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.