शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

By admin | Published: September 29, 2016 6:07 AM

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर सुरेश शेवाळे, माजी

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर सुरेश शेवाळे, माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे चिरंजीव राघवेंद्र ऊर्फ बापू मानकर, राष्ट्रवादीचे खडकवासला मतदारसंघाचे माजी सरचिटणीस दिलीप वेडे-पाटील, विजय शेवाळे यांच्यासह धनकवडीतील गणेश भिंताडे व वडगावशेरीचे शैलेश बनसोडे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये प्रवेशाचा सोहळा पार पडला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते. औंध-खडकी, कोथरूड, खडकवासला, धनकवडी व वडगावशेरी भागांत पक्ष वाढविण्यास भाजपला मदत होणार आहे. पक्षांतरामुळे महापालिका निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचे चिरंजीव राघवेंद्र मानकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी मनसेचे नगरसेवक राजेंद्र बराटे व राष्ट्रवादीचे नगरसेवक दिलीप धाडवे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते. मात्र, पक्षाने कारवाईचा बडगा उचलण्याची तयारी सुरू करताच दोन्ही नगरसेवकांनी पक्षप्रवेशाचा इन्कार केला. त्यापाठोपाठ आता भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, ‘‘राजकारणातील चांगल्या माणसांचा ओढा भाजपकडे वाढला आहे. ज्यांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली, त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.’’राघवेंद्र मानकर यांनी २०१२ साली काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय त्याने वैयक्तिक पातळीवर घेतलेला आहे. या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अथवा माझ्याशी कोणताही संबंध नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांनी दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर सुरेश शेवाळे यांच्या पक्ष सोडण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही. गेल्या ५ वर्षांपासून शेवाळे पक्षात सक्रिय नव्हते असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी स्पष्ट केले आहे.