शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

बारामतीत भरणार आता राष्ट्रवादी काँग्रेसचा दरबार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 4:59 PM

संस्थानिहाय पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

बारामती दि ३० (प्रतिनिधी)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनता दरबाराच्या संकल्पेवर आधारीत कार्यक्रम आता बारामती शहर आणि तालुक्यात राबवण्यात येणार आहे.याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचना दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.त्यानुसार बारामती शहर,तालुक्यात आता प्रत्येक गुरुवारी संस्थानिहाय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या सुचनेनुसार याबाबतची अंमलबजावणी उद्यापासुन (दि १) सुरु होत आहे. सकाळी १०:००ते ०१:०० वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा येथे हा जनता दरबार भरणार आहे. या ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद,मार्केट कमिटी, दूध संघ, खरेदी विक्री संघ, सचिव संस्था, सोमेश्वर,माळेगाव,भवानीनगर कारखाना, संजय गांधी, विद्युत वितरण व पुरवठा कमिटीसह पक्ष प्रतिनिधी व सर्व संस्थांचे प्रमुखांची उपस्थिती असणार आहे. तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी शासन दरबारी सोडविण्यासाठी तसेच विकासकामे,सहकारी संस्था व कामकाज अडचणी व मदतीसाठी हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दर आठवड्याच्या गुरुवारी हा उपक्रम नियमितपणे चालू राहणार आहे.

तरी सर्व कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे,उपक्रमास सहकार्य करून जनतेच्या सार्वजनिक, वैयक्तिक, गाव विकासाच्या व शासकीय अडचणी सोडवण्यासाठी मदत करावी, अशी सुचना दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होळकर यांनी सांगितले.

———————————————

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार