पुणे/ सासवड : आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन पदाधिकारी निवडीचे संकेत मिळताच नाराजीनाट्य सुरू झाले आहे. परंदर तालुक्यातील सर्वच जुन्या पदाधिकाºयांनी राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे दिल्याने खळबळ उडाली आहे.पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी पोमण, तालुका महिला अध्यक्ष गौरी कुंजीर, युवकचे अध्यक्ष पुष्कराज जाधव, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन जाधवराव यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडे दिले असून, एक प्रत खासदार सुप्रिया सुळे यांना दिली आहे, अशी माहिती तालुका अध्यक्ष शिवाजी पोमण यांनीच पत्रकार परिषद घेऊन दिली. याप्रसंगी राजीनामे दिलेले पदाधिकारीही उपस्थित होते. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. पुढील आठवड्यात पक्षाचे क्रियाशील सदस्यांची राज्य तसेच जिल्हा व राज्य प्रतिनिधी निवडीसाठी पक्ष निरीक्षक राजेंद्र कोरेकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचे समजते. यात काही नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असून, काही जुन्या पदाधिकाºयांनाही कायम करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर पुरंदरमधील पदाधिकाºयांचे राजीनामे हे नाराजीनामे तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच हल्लाबोल आंदोलन यशस्वी ठरले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचा गावभेट दौरा झाला. त्याच्या दुसºयाच दिवशी राजीनामे दिल्याने पक्षकार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सुळे यांना अपेक्षित असलेली तालुका संघटना बांधण्याच्या कामात भविष्यात पक्षाचे सच्चे कार्यकर्ते म्हणून अग्रभागी राहू, असे पोमण यांनी या वेळी सांगितले.या संदर्भात जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याशी संपर्क साधला असता, कसलीही नाराजी नसून, मी या पदाधिकाºयांशी चर्चा करणार आहे. नवीन कार्यकर्त्यांनाही संधी दिली जाणार असून, जुन्या पदाधिकाºयांच्या कामाची दखलही घेतली जाणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीत नाराजीनाट्य? पुरंदरमध्ये पडसाद, सर्वच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 3:45 AM