राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार अतुल बेनके व तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. या वेळी जुन्नर तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार सुधीर वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जि.प.सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूरज वाजगे, तालुका महिला अध्यक्ष सुरेखा वेठेकर, सभापती विशाल तांबे, अनिल तात्या मेहेर, दिलीप कोल्हे, उज्ज्वला शेवाळे, बाळासाहेब खिलारी, राजश्री बोरकर, भाऊ देवाडे, धनराज खोत, अतुल भांबेरे, बाळासाहेब सदाकाळ, गणेश वाजगे, तुळशीराम भोईर, धोंडिभाऊ पिंगट, अशोक घोडके, भाऊ कुंभार, राहुल गावडे, सुजाता डोंगरे ,वैजयंती कोऱ्हाळे उपस्थित होते.
आमदार अतुल बेनके म्हणाले की, मोदीसरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला, तर डिझेल ९३ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली, तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ८०० ते ९०० रुपये झाला आहे. यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. नागरिकांचे घरखर्च व कुटुंबाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यूपीए सरकारच्या काळामध्ये पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ०९.४८ रुपये होती, ती आज ३२.९० रुपये म्हणजे २५८ टक्के वाढ. डिझेलवरील एक्साईज ड्यूटी ०३.५६ रुपये होती ती ३१.८० रुपयांवर गेली आहे म्हणजे ८२०टक्के वाढ करण्यात आली आहे. यापुढील काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती जर कमी करण्यात आल्या नाहीत, तर मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
१० नारायणगाव
जुन्नर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने नारायणगाव येथे दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.