शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

जागावाटपावरून राष्ट्रवादीत दुफळी!

By admin | Published: May 04, 2017 1:47 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २० मे रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये जागावाटपाच्या मुद्यावरून

शिरूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २० मे रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये जागावाटपाच्या मुद्यावरून दुफळी निर्माण झाली. आमदार दिलीप वळसे-पाटील व माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांच्या समन्वय बैठकीत ठरल्याप्रमाणे जागावाटप झाले नसून अ‍ॅड. पवार यांनी वळसे-पाटील यांना डावलून एन. टी. ओबीसीची जागा दुसऱ्यांना दिल्याचे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एका नेत्याने सांगितले.शिरूर तालुक्यातील ३९ गावे ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली आहेत. या ३९ गावांचा मिळून राष्ट्रवादीचा वेगळा पॅनेल टाकायचा. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वेळी माजी आमदार अ‍ॅड. पवार, पोपटराव गावडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी राष्ट्रवादीचा एकच पॅनेल असेल, असे स्पष्ट केले होते. आज उमेदवारांचे चिन्हवाटप होते. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला छत्री चिन्ह मिळाले. ३९ गावांतील पाच उमेदवार वगळता राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांनी वेळेत येऊन छत्री चिन्ह घेतले. मात्र प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर, शंकर जांभळकर, बाबाजी निचीत, कौत्सल्या भोर हे पाच जण वेळेत न आल्याने त्यांना दुसरे चिन्ह मिळाले.पाच जणांनी वेगळे चिन्ह स्वीकारले. इथेच राष्ट्रवादीतील दुफळीचा प्रत्यय आला. याबाबत माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले, की जागावाटपासंदर्भात अ‍ॅड. पवार यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. दिलीप वळसे-पाटील यांच्या शब्दालाही अ‍ॅड. पवार यांनी मान दिला नाही. हा वळसे-पाटील यांचा अपमान करण्याचा प्रकार आहे. यामुळे आमच्या ३९ गावांतील ५ उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विचार केला आहे. वळसे-पाटील यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. गावडे यांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादीतील मतभेद स्पष्ट झाले. माजी सभापती प्रकाश पवार यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. त्यांनी एन. टी. व ओबीसीच्या जागेवरून वाद निर्माण झाल्याचे उमेदवार बदलल्याचे कबूल केले. मात्र वळसे-पाटील यांच्याशी चर्चा केल्यावरच पुढील भूमिका ठरवू, असे स्पष्ट केले. आमचा (राष्ट्रवादीचा) एकच पॅनेल असेल, असे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अ‍ॅड. पवार यांच्या नेतृत्वाबाबत त्यांनी बोलायचे टाळले.एक महिन्यापूर्वी ‘लोकमत’ला प्रतिक्रिया देताना प्रकाश पवार यांनी राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व अ‍ॅड. पवार हेच करतील, असे स्पष्ट केले होते. आज मात्र ज्या पाच जणांनी अ‍ॅड. पवार यांच्या नेतृत्वावर अविश्वास व्यक्त केला. त्यात प्रकाश पवार यांचा समावेश आहे, हे विशेष (ही बाब ते नाकारत असले तरी) असेल, असे स्पष्ट असले तरी निर्माण झालेली दुफळी येत्या काही दिवसांत भरून निघेल हा प्रश्न आहे. ३९ गावांत गावडे व माजी सभापती पवार यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचा पॅनेल निवडून आणण्यात गावडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. राष्ट्रवादीतील दुफळीबाबत जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांना विचारले असता, त्यांनी तालुकाध्यक्षांकडून, नेत्यांकडून माहिती घेतो, असे उत्तर दिले. अ‍ॅड. पवार यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. दुफळी राष्ट्रवादीत पडली. याबाबत भाजपाची मंडळीच पत्रकारांना माहिती देत होती. भाजपाच्या तालुकाध्यक्षाने याबाबत पत्रकारांना फोन केले, हे विशेष. राष्ट्रवादीतील दुफळीचा भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे.