बारामतीत बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच गुलाल; अजित पवारांच्या रणनीतीसमोर विरोधक गारद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 03:11 PM2023-04-29T15:11:29+5:302023-04-29T15:11:58+5:30

अजित पवार यांच्या रणनीतीसमोर विरोधक गारद झाल्याचे चित्र पहावयास मिळाले...

NCP wins Baramati market committee Opposition guards against Ajit Pawar's strategy | बारामतीत बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच गुलाल; अजित पवारांच्या रणनीतीसमोर विरोधक गारद

बारामतीत बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच गुलाल; अजित पवारांच्या रणनीतीसमोर विरोधक गारद

googlenewsNext

बारामती (पुणे) : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलने सर्व जागा जिंकत बाजार समितीवरील वर्चस्व कायम राखले आहे. राष्ट्रवादीने होमपीचवर बाजार समितीची सत्ता एकहाती राखण्यात यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रयत पॅनलने यापुर्वीच १ जागा बिनविरोध करण्यात यश मिळविले. तर इतर १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व जागांवर राष्ट्रवादीने वर्चस्व कायम राखले आहे. अजित पवार यांच्या रणनीतीसमोर विरोधक गारद झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

भाजप आणि मित्रपक्षांनी एकत्र येत राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटले होते. गेल्या महिन्याभरापासून  बाजार समितीची रणनीती आखण्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली. यामध्ये अखेर राष्ट्रवादीने बाजी मारली. भाजपने यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच मैदानात राष्ट्रवादीला घेरण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभुमीवर भाजपने बाजार समितीच्या निवडणुकीत लढत देण्याची तयारी केली होती. एक जागा वगळता भाजपने सर्व जागांवर लढत दिली. तर खुद्द अजित पवार यांनी दोन सभा घेतल्या. त्यामुळे बाजार समितीच्या आखाड्यात चांगलीच रंगत आली होती.  

भाजपसह मित्रपक्षांनी मोट बांधली. मात्र, निवडणुकीत मिळालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार भाजप मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ग्रामीण भागातील सर्व सहकारी संस्थांवर एक हाती वर्चस्व आहे. त्यामुळे मतदारांशी संबंधित संस्था, सहकारात पवार गटाचा दबदबा असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने सलामीलाच निलेश भगवान लडकत यांच्या रुपाने  कृषि पतसंस्था इतर मागासवर्ग मतदारसंघातून १ जागा बिनविरोध निवडून आणली. १७ जागांसाठी राष्ट्रवादीच्या रयत पॅनल आणि भाजपच्या शेतकरी विकास  पॅनल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये लढत झाली. यात सर्व जागांवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळविले. बारामती कृषी उत्पन्न बाजर समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रयत पॅनल 

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-
कृषी पतसंस्था: सर्वसाधारण मतदारसंघ-विनायक महादेव गावडे—११७८,सतीश सर्जेराव जगताप—११४३,रामचंद्र शामराव खलाटे—११५३,बापुराव दौलतराव कोकरे—११६६,दयाराम सदाशिव महाडीक—११४८,सुनील वसंतराव पवार—११३१,दत्तात्रय शंकरराव तावरे—१११६.
कृषि पतसंस्था महिला प्रतिनिधी—शोभा विलास कदम—१२११,प्रतिभा दिलीप परकाळे—१२३३.कृषि पतसंस्था भटक्या विमुक्त जाती व जमाती:शुभम प्रताप ठोंबरे—१२१०.कृषि पतसंस्था इतर मागासवर्गीय प्रतिनिधी—निलेश भगवान लडकत(बिनविरोध). ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ:विशाल महादेव भोंडवे—४३०,विश्वास तानाजी आटोळे—४२४.
ग्रामपंचायत अनुसूचित जाती— जमाती: अरुण गणपत सकट—४५१.ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल—युवराज कै लास देवकाते—४३७.अनुज्ञप्तीधारक व आडते—संतोष पांडुरंग आटोळे—२०४,मिलींद अशोक सालपे—२२०.हमाल व तोलारी—नितीन शंकर सरक—१४१.

राष्ट्रवादी काँग्रेसचा एकतर्फी विजय अपेक्षेप्रमाणेच झाला आहे. या निकालाने पुन्हा विरोधकांना त्यांची जागा दाखवुन दिली आहे. आमचे नेते अजितदादा पवार यांनी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी,व्यापाऱ्यांसह विकासाची भुमिका घेतली. त्याचा कृषि क्षेत्रासह व्यापाराला फायदा झाला. आज पुर्ण एकतर्फी निकाल देऊन मतदारांनी दादांनी केलेल्या कामाची पावती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच सक्षम पर्याय देऊ शकते, हे आजच्या निकालाने सिध्द झाले आहे.
-जय पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शहर अध्यक्ष)

Web Title: NCP wins Baramati market committee Opposition guards against Ajit Pawar's strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.