रहाटणी : प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमध्ये खरी लढत भाजपा व राष्ट्रवादी पक्षात झाली. शहरात काही ठिकाणी मोदी लाट सुरु असताना मात्र येथील निकाल वेगळाच लागला. या प्रभागात तीन राष्ट्रवादी तर एक अपक्ष निवडून आला आहे. या प्रभागात सुमारे ६२ टक्के म्हणजे २६७३४ असे विक्रमी मतदान झाले होते. प्रभाग क्र. २२ काळेवाडी अ गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार विनोद नढे यांनी ८५३४ मते घेतली, तर भाजपाचे उमेदवार सुरेश नढे यांना ५८५० मते पडली. त्यामुळे २६८४ मतांनी विनोद नढे यांचा विजय झाला. येथील विद्यमान नगरसेवक प्रमोद ताम्हणकर यांना २७१६ मते पडली, तर शिवसेनेचे उमेदवार पालकर यांना २६७९ मते पडली. अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांना १४९७ मते पडली. ब गटातून अपक्ष उमेदवार व विद्यमान नगरसेविका नीता पाडाळे यांना ९९७१ मते पडली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व विद्यमान नगरसेविका विमल काळे यांना ५९५८ मते पडली. त्यामुळे ४०१३ मतांनी पाडाळे यांचा विजय झाला. भाजपाच्या उमेदवार विजया सुतार यांना ४७१२ मते मिळाली. तर शिवसेनेच्या उमेदवार सुजाता भोईटे यांना १३२७ मते मिळाली. अपक्ष उमेदवार दीपा आंब्रे यांना २२७० मते मिळाली. काँग्रेसच्या ज्योती कोंढरे ११६८ मते मिळाली. या गटात सुरुवातीपासून अपक्ष उमेदवार नीता पाडाळे व राष्ट्रवादीच्या उमेदवार विमल काळे यांच्यातच चुरस होती. ऐनवेळी राष्ट्रवादीने पाडाळे यांची उमेदवारी नाकारल्याने सहानुभूतीची लाट उभी राहिली असल्याची चर्चा प्रभागात आहे. क गटात राष्ट्रवादीच्या उमेदवार उषा काळे यांना ११०९६ मते पडली,तर भाजपाच्या ज्योती भारती यांना ७९४० मते पडली. त्यामुळे ३१५६ मतांनी उषा काळे विजयी झाल्या. शिवसेनेच्या सुजाता नखाते यांना ५०१३ मते मिळाली. ड गटात राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष कोकणे यांना सर्वाधिक १२७०१ मते मिळाली. तर त्यांचे विरोधक भाजपाचे उमेदवार कुमार जाधव यांना ६१७५ मते मिळाली. त्यामुळे कोकणे यांचा ६५२६ मतांनी विजय झाला. काँग्रेसचे उमेदवार सजी वर्की यांना ३६९५ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार बाळासो नढे यांना २८१२ मते मिळाली. अपक्ष उमेदवार किरण नढे यांना ६२३ मते मिळाली. (वार्ताहर)
‘राष्ट्रवादी’चे तीन उमेदवार विजयी
By admin | Published: February 25, 2017 2:25 AM