शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

'केंद्राने सुडबुद्धीने कारवाई केली'; बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 1:50 PM

राज्यात आयकर विभागाकडून अजित पवार (ajit pawar) यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी सुरु असलेल्या कारवाईचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला.

बारामती (पुणे): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित निकटवर्तीय आणि संस्थांवर आयकर विभागाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून धाडसत्र सुरु  आहे. केंद्र सरकारने सुडबुध्दीने ही कारवाई केल्याचा आरोप करीत शनिवारी(दि ९) राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्राचा निषेध करीत 'अजितदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

राज्यात आयकर विभागाकडून पवार यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी सुरु असलेल्या कारवाईचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्राच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी महिलाच्या शहराध्यक्षा अनिता गायकवाड, तालुकाध्यक्षा वनिता बनकर, युवती अध्यक्षा आरती शेंडगे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, बाजार समितीचे वसंतराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य विश्वास देवकाते यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

शहरातील भिगवण चौकात हुतात्मा स्तंभाजवळ सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. यावेळी मुख्य चौकातच गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीवर देखील परीणाम झाल्याचे चित्र होते.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारIncome Taxइन्कम टॅक्स