शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

राष्ट्रवादीचा हल्लाबोल! पुणे जिल्ह्यात आंदोलन, ‘या राज्य शासनाचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 3:00 AM

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारच्या विरोधात सोमवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. बारामती, दौैंड, इंदापूर, सासवड येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. विविध मागण्या करीत शासनाच्या धोरणांचा निषेध केला.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारच्या विरोधात सोमवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. बारामती, दौैंड, इंदापूर, सासवड येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. विविध मागण्या करीत शासनाच्या धोरणांचा निषेध केला. पुढील काळात हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफीबारामती : शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. शहरातील शारदा प्रांगण येथून या मोर्चाला सुरुवात झाली. प्रशासकीय भवन येथे प्रांताधिकारी हेमंत निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.‘या राज्य शासनाचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत शारदा प्रांगण येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासकीय भवनावर मोर्चा काढला. प्रशासकीय भवन येथे कार्यकर्त्यांसमोर बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते म्हणाले की, राज्य शासन फसवे आहे. कर्जमाफीनंतरही शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत. जर शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी केली नाही तर येथून पुढच्या काळात राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वीतने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सभापती संजयभोसले, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर यांच्यासह विविधसंस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.‘मी लाभार्थी’च्या जाहिराती खोट्यासासवड : येथे सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या उपस्थितीत पुरंदर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने शासनाविरोधात हल्लाबोल आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या वेळी सुळे यांनी शासनाच्या शेतकºयांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, वाढती महागाई, शेतीपंपांची अवाजवी बिल अशा विविध धोरणांवर टीका करीत हे खोटारडे सरकार असून ‘मी लाभार्थी’च्या सर्व जाहिराती खोट्या असल्याचे सांगितले.तसेच १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व खड्डे बुजले नाहीत, तर १६ डिसेंबरपासून बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशाराही सुळे यांनी दिला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी या फसवणूकमंत्र्यांचा पर्दाफाश करण्याचे काम करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, बबूसाहेब माहूरकर, गौरी कुंजीर, नीलेश जगताप, वंदना धुमाळ, प्रकाश कड, संतोष ए. जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.शेतमालाला हमीभाव द्या...दौैंड : दौैंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा शांततेत झाला. या वेळी आंदोलकांनी भाजपा सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, यासह अन्य मागण्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.येथील पंचायत समितीपासून सुरू झालेल्या या मोर्चाची सांगता नवीन प्रशासकीय इमारतीजवळ झाली. या वेळी जाहीर सभेत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र आणि राज्यातील सरकार हे शेतकरीविरोधात सरकार असून, सर्वसामान्य जनता हैैराण झाली आहे, तर जीएसटीमुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त आहेत. तेव्हा हे सरकार नेमके कुणाचे, असाही प्रश्न निर्माण होतो.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसखोटे बोलतात मात्र रेटून बोलतात. दौैंड तालुक्यात रस्त्यांचीदुरवस्था झाली आहे. तेव्हा दौैंड ते सिद्धटेक या रस्त्यावरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत भरले गेले पाहिजेत, तर शहरातील रस्ते चांगल्या स्थितीत झाले पाहिजे असे शेवटी सुळे म्हणाल्या.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत या सरकारला जनता माफ करणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी देशातील शेतकºयांची कर्जमाफी केली होती. मात्र, या सरकारला राज्यात कर्जमाफी करता आली नाही. जी काही अल्पप्रमाणात कर्जमाफी केली ते देखील पैैसे बँकांना द्यायला लावले आहेत, असे शेवटी थोरात म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पासाहेब पवार यांनी केले.या वेळी सभापती मीनाधायगुडे, उपसभापती सुशांत दरेकर, वैशाली नागवडे, गुरुमुख नारंग, वीरधवल जगदाळे, अ‍ॅड. अजित बलदोटा, सारिका पानसरे, योगिनी दिवेकर, वैशाली धगाटे, ज्योतीझुरुंगे, बादशहा शेख, महेश भागवत, इंद्रजित जगदाळे, योंगेद्र शितोळे, सत्वशील शितोळे, नितीन दोरगे, प्रकाश नवले, शिवाजी लकडे,सोहेल खान, सचिन गायकवाड, प्रशांत धनवे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोकळ आश्वासने देऊन फसवणूकइंदापूर : गेल्या तीन वर्षांत सत्तेत असणारे भाजपा-सेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याची खरमरीत टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज (दि. २७) येथे केली.भाजपा सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते. तत्पूर्वी नगरपरिषदेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजीमहाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून शहराच्या मुख्य बाजारपेठेतून घोषणाबाजी करत व सरकारच्या निषेधाचे फलक उंचावत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चाने तहसील कार्यालयाच्या आवारात आले. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.आमदार भरणे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून भाजपा-सेना सरकार राज्यात सत्तेवर आहे. सर्वच आघाड्यांवर ते सपशेल अपयशी ठरले आहे. पोकळ आश्वासने देऊन या सरकारने लोकांची फसवणूक केली आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, छोटे व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर अशा सर्व स्तरामध्ये शासनाविषयी असंतोष पसरला आहे. राज्याच्या गरजेनुसार आवश्यक असणाºया विषयांना प्राधान्य देण्याऐवजी बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग अशा योजनांसाठी राज्याचा महसुलाचा निधी वळवला जात आहे.राज्य शासनाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूर विधी मंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे, त्या मोर्चात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन आमदार भरणे यांनी केले.या वेळी प्रदीप गारटकर, अप्पासाहेब जगदाळे, महारुद्र पाटील, प्रवीण माने, शुभम निंबाळकर आदींची भाषणे झाली. अनिल राऊत यांनी सूत्रसंचालन केले.प्रतापराव पाटील, किसन जावळे, सचिन सपकळ, अनिकेत वाघ, अरबाज शेख, वसंत आरडे, पोपट शिंदे, अमर गाडे, श्रीधर बाब्रस, धनंजय बाब्रस, महादेव लोखंडे, सचिन चव्हाण, रेहाना मुलाणी, राजश्री मखरे, उमा इंगोले, उषा स्वामी व इतर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

टॅग्स :Puneपुणे