शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीच्या दीपाली धुमाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 20:17 IST

चर्चेमध्ये नसलेल्या नावाची घोषणा झाल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना धक्का

ठळक मुद्देपवार यांनी विद्यमान विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांना राजीनामा देण्याचे दिले होते आदेश

पुणे : महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नगरसेविका दीपाली धुमाळ यांची नावड करण्यात आली आहे. धुमाळ यांच्या निवडीमुळे विरोधी पक्षनेतेपद पुन्हा एकदा वारजे-कर्वेनगर प्रभागाला मिळाले आहे. आधीचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांच्याच प्रभागाला पुन्हा हे पद मिळाले आहे. चर्चेमध्ये नसलेल्या नावाची घोषणा झाल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना धक्का बसला. राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर अजित पवार अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री झाले. 2017 पुर्वी पुणे महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. ही सत्ता भाजपाने खेचून घेतल्यावर राष्ट्रवादीला विरोधी बाकांवर बसावे लागले. पालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्याच्यादृष्टीने तसेच सत्ताधारी भाजपाला रोखण्याकरिता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरुन लक्ष घातले जाऊ लागले आहे. नुकतीच अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पालिकेत बैठक घेऊन याची प्रचिती दिली आहे.   पवार यांनी विद्यमान विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्यावर या पदावर वर्णी लावून घेण्याकरिता इच्छूकांकडून ‘लॉबिंग’ सुरु करण्यात आले होते. या पदाकरिता खडकवासला विधानसभा निवडणूक लढविलेले नगरसेवक सचिन दोडके, नगरसेवक महेंद्र पठारे, योगेश ससाणे, माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, वैशाली बनकर, दिपाली धुमाळ या इच्छुक होत्या. शुक्रवारी यासंदर्भात पालिकेतील राष्ट्रवादीच्या कक्षात नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला शहराध्यक्ष तथा आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेता दिलीप बराटे आदी उपस्थित होते. या बैठकीत धुमाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.धुमाळ यांंनी यापुर्वी महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती, स्थायी समिती, विधी समिती, शहर सुधारणा, वृक्ष प्राधिकरण, जैव वैविधता समितीवर काम केले आहे. त्यांचे पती प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ हे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. ======धुमाळ यांचे मुळगाव रायगड तालुक्यातील पाली-सुधागड हे असून त्यांचे शिक्षण बीएससीच्या द्वितीय वर्षापर्यंत झाले आहे. त्यांच्या नियुक्तीमागे  ‘रायगड’ कनेक्शन असल्याचे बोलले जात असून राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांच्याशी असलेली बाबा धुमाळ यांची जवळीक उपयोगी ठरल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक बोलत आहेत.  

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवार