शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

शिरूर बाजार समितीवर राष्ट्रवादीचाच झेंडा

By admin | Published: May 22, 2017 6:40 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी १३ जागा जिंकून समितीवर विजयाचा झेंडा फडकवला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी १३ जागा जिंकून समितीवर विजयाचा झेंडा फडकवला. आमदार बाबूराव पाचर्णे यांना मात्र आपल्या पराभवाची मालिका खंडित करण्यात यश आले नाही. आजचा आमचा विजय हा नैतिकतेचा; तसेच सर्वसामान्यांचा विजय असून, विधानसभेनंतर तालुकास्तरावर झालेल्या सर्व निवडणुकांत जनतेने आमदारांचा चांगलाच ढोल बडवला आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी दिली.आज सकाळी ९ ला मतमोजणीस प्रारंभ झाला. बॅलेट पेपरवर मतदान झाल्याने मतपत्रिकेची जुळवणी करण्यात बराच वेळ गेला. सर्वांत प्रथम व्यापारी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण चोरडीया व सुदीप गुंदेचा हे अनुक्रमे ३४४ व २६८ मते मिळवून विजयी झाले. यानंतर सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी झाली. या मतदारसंघात अटीतटीची लढत झाल्याचे स्पष्ट झाले. शशिकांत दसगुडे यांना सर्वाधिक ९०८ मते मिळाली. प्रकाश पवार ८५२, शंकर जांभळकर ८१८, वसंत कोरेकर ७६१, विश्वास ढमढेरे ७५१ मते मिळवून राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून विजयी झाले. भाजपा पॅनेलचे राहुल गवारी व संतोष मोरे हे अनुक्रमे ८१८ व ६७२ मते मिळवून विजयी झाले.महिला मतदारसंघात भाजपाच्या (शेतकरी सहकार विकास पॅनेल) पॅनेलच्या छायाताई बेनके व राष्ट्रवादीच्या (शेतकरी विकास पॅनेल) पॅनेलच्या मंदाकिनी पवार या ८५७ व ७४९ मते मिळवून विजयी झाल्या. भटक्या विमुक्त मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश कोळपे यांचा ९९ मतांनी विजय झाला. त्यांना ७७२, तर भाजपाच्या हेमंत पवार यांना ६७३ मते मिळाली. ओबीसी मतदारसंघात भाजपाच्या विकास शिवले यांचा २०२ मतांनी विजय झाला. त्यांना ८२४, तर राष्ट्रवादीच्या संदीप गायकवाड यांना ६२२ मते मिळाली.ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात राष्ट्रवादीचे मानसिंग पाचुंदकर व धैर्यशील मांढरे हे अनुक्रमे ६७९ व ४८० मते मिळवून विजयी झाले. तिसऱ्या क्रमांकावर असलेले अनिल नवले यांना ४४४ मते मिळाली, तर संभाजी कर्डिले यांना १८९ मतांवर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती प्रवर्गात राष्ट्रवादीचे विजेंद्र गद्रे यांनी भाजपाच्या तुकाराम थोरात यांचा ४३७ मतांनी पराभव केला. गद्रे यांना ६६९, तर थोरात यांना २३२ मते मिळाली.निकालाचे चित्र स्पष्ट होताच राष्ट्रवादीच्या समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके वाजवून एकच जल्लोष केला. हमाल तोलारी मतदारसंघासाठी झालेल्या एकूण १४३ मतदानापैकी बंडू जाधव यांना ७०, तर विरोधी भाजपा पॅनेलचे कुंडलिक दसगुडे यांना ६९ मते मिळाली. यात चार मते बाद झाली. मात्र, एका बाद मतावर भाजपाने हरकत घेतली. यावरून राष्ट्रवादी व भाजपाच्या कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक उडाली. राष्ट्रवादीचे मानसिंग पाचुंदकर यांनी बाद झालेले मत योग्य असल्याचे ठासून सांगितले. वाद वाढल्याने हा निकाल राखीव ठेवण्यात आला. भाजपाने फेर मतमोजणीची मागणी केली. फेरमतमोजणीत आहे तशीच परिस्थिती राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा जाधव यांनी जाधव यांना विजयी घोषित केले.