पुणे : जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकातही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. १३ पंचायत समित्यांमध्ये ७ पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती विराजमान झाल्याने जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आाणि भाजपचे प्रत्येकी दोन पंचायत समित्यांमध्ये सभापतिपदी वर्णी लागली आहे़ मात्र, जिल्ह्याचा बालेकिल्ला असणाऱ्या हवेली पंचायत समितीमध्ये आरक्षण सोडतीचा फटका राष्ट्रवादी कॉग्रेसला बसला असून, या पंचायत समितीवर भाजपच्या महिला सदस्यांची निवड झाली.जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला पदासाठी आरक्षित आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याला अध्यक्ष निवडीचे वेध लागले होते. त्या अधीच पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत होऊन निवडीही झाल्या. त्यामध्ये जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांमध्ये महिलाराज सुरु झाले आहे. या सभापती निवडीमध्ये बहुतांश निवडी या बिनविरोध झाल्या. पुढील अडीच वर्षांसाठी बारामती पंचायत समिती सभापतीचा मान सुपे गणातील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नीता संजय बारवकर यांना मिळाला आहे. तर उपसभापती म्हणून कोºहाळे गणातील प्रदीप धापटे यांना मिळाला आहे. दौंडमध्ये आशा नितीन शितोळे यांची सभापती तर नितीन शांताराम दोरगे यांची उपसभापतिपदी निवड झाली. आंबेगावमध्ये संजय गवारी यांना सभापती तर संतोष यमनाजी भोर यांना उपसभपतिपदाचा बहुमान मिळाला. तसेच शिरूर तालुक्यात मोनिका नवनाथ हरगुडे यांची सभापती तर सविता प्रमोद पºहाड यांची उपसभापती निवड झाली. मुळशीमध्ये पांडुरंग मारूती ओझरकर यांची सभापती आणि विजय अरूण केदारी यांची उपसभापती निवड झाली आहे. तसेच भोर तालुक्यात श्रीधर रघुनाथ केंद्रे यांना सभापती आणि दमयंती पर्वती जाधव यांना उपसभापतिपदाचा बहुमान मिळाला आहे. या सहा पंचायत समितीमध्ये दोन्ही पदे राष्ट्रवादीकडे आहेत. तर पुरंदर तालुक्यात शिवसेनेच्या नलिनी हरिभाऊ दोरगे यांना सभापती तर गोरखनाथ बाबूराव माने यांना उपसभापतिपदाचा बहुमान मिळाला. वेल्हे तालुक्यात कॉग्रेसचे दिनकर पांडुरंग सरपाले यांची सभापती तर सीमा विष्णू राऊत यांची उपसभापतिपदी निवड झाली. इंदापूरला पुष्पा अविनाश रेडके यांची सभापती आणि संजय पंढरीनाथ देहाडे यांची उपसभापती निवड झाली आहे. खेड तालुक्यात तालुक्यात शिवसेनेचे अंकुश सुदाम राक्षे यांची सभापती तर ज्योती केशव अरगडे यांची उपसभापतिपदी निवड झाली. दरम्यान, हवेली तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही आरक्षण सोडतीमुळे सभापतिपदावर भाजपच्या फुलाबाई अशोक कदम यांची निवड झाली. तर अपक्ष म्हणून युगंधर मोहन काळभोर यांची निवड झाली. उपसभापतीला शेवटी दोन अर्ज राहिल्यामुळे हात वर करून मतदान घेण्यात आले. मावळमध्येही भाजपच्या निकिता नितीन घोटकुले तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी कॉग्रेसचे दत्तात्रय नाथा शेवाळे यांची निवड झाली. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे विशाल गुलाब तांबे यांना सभापती तर शिवसेनेचे रमेश धोंडीभाऊ खुडे यांना उपसभापतिपदाचा बहुमान मिळाला.........सात ठिकाणी महिलाराजजिल्ह्यातील पंचायत समितीचे आरक्षण निघाल्यावर बहुतांश जागा या महिलांसाठी राखीव होत्या. जवळपास ७ जागा महिलांसाठी असल्याने या ठिकाणी सर्व सूत्रे महिला चालवणार आहेत...........पंचायत समिती सभापतिपदाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरुर, मुळशी, दौंड, भोर आणि बारामती या पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती झाले आहेत.तर इंदापूर आणि वेल्हे या पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसचे सभापती झाले आहेत़ खेड आाणि पुरंदरमध्ये शिवसेनेचे सभापती झाले आहेत, तर मावळ आणि हवेली तालुक्यांत भाजपचे सभापती झाले आहेत़
पुणे जिल्ह्यातील पंचायत समितींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 5:21 PM
काही ठिकाणी महाविकास आघाडी : हवेलीत भाजपला लागली लॉटरी
ठळक मुद्देजिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आाणि भाजपचे प्रत्येकी दोन पंचायत समित्यांमध्ये सभापतिपदी वर्णी