पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमधील विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवक फोडण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहेत. नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे यांचे पती संजय बोऱ्हाडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा व माजी नगरसेविका ऊर्मिला काळभोर, माजी नगरसेविका सुषमा गावडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील व इतरही पक्षातील आजी-माजी नगरसेवकांना शिवसेनेत घेतले जात आहे. भाजपापाठोपाठ आता राष्ट्रवादीतून शिवसेनेत येण्याचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नगरसेवक आणि माजी नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थित प्रवेश केला आहे. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार गौतम चाबुकस्वार, आमदार सुरेश गोरे, जिल्हाप्रमुख राम गावडे, शहर संघटिका सुलभा उबाळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक शिवसेनेच्या ताफ्यात
By admin | Published: November 15, 2016 3:19 AM