पुणे : लोकसभा निवडणुकांमध्ये पदरी पडलेली निराशा आणि पक्षाला लागलेली गळती याचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या ‘सॉफ्टवेअर’च्या सहाय्याने कार्यकर्त्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जात आहे. भाजपाच्या ‘बूथ प्रमुख व पन्ना प्रमुख’ या नियोजनाच्या धर्तीवर शेवटच्या फळीपर्यंतचे नियोजन करण्यात आले असून प्रत्येक यादीमागे ३०० ते ४०० मतदानाचे लक्ष्य बूथ प्रमुखांना देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांसाठी एक सॉफ्टवेअर दिले. या सॉफ्टवेअरमध्ये कार्यकर्त्यांच्या कामाची माहिती अपलोड केली जाते. कार्यकर्ते नेमके काय काम करतात याची माहिती थेट वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पहायला मिळते. प्रसंगी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापासून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते, खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संपर्क साधू शकतात. या सॉफ्टवेअरचा लोकसभा निवडणुकांवेळी जास्त प्रमाणात वापर केला गेला. पुण्यामध्येही या सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे. शहरातील मतदारांच्या याद्यांच्या संख्येनुसार बूथ प्रमुख नेमण्यात आले आहेत. प्रत्येक यादीमध्ये साधारणपणे एक हजार ते १२०० मतदारांची नावे असतात. या मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी त्याच यादीमधील कार्यकर्त्याला बूथ प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. या बूथ प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली दहा किंवा त्यापेक्षा अधिक कितीही सदस्य जोडीला देण्यात येतात. या बूथ प्रमुखांसह सदस्यांकडून पक्षासाठी अधिकाधिक नागरिक जोडण्यासोबतच त्याची माहिती सॉफ्टवेअरमध्ये जोडण्याचे काम केले जाते. यादीमधील मतदारांशी कायमस्वरुपी संपर्क प्रस्थापित करण्याच्या सूचना या बूथ प्रमुखांना करण्यात आलेल्या आहेत. बूथ प्रमुखासह त्याच्या टीममधील सदस्यांनी दररोज २५ ते ३० घरांशी दैनंदिन संपर्क ठेवायचा तसेच त्यांना येणाºया समस्या, अडचणी दूर क रायच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यांना येणाºया समस्या, शासकीय कामे, नागरी समस्यांचे निराकरण केल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल. याच विश्वासातून प्रत्येक यादीमागे ३०० ते ४०० मतदान राष्ट्रवादीला होईल असे लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ‘सॉफ्टवेअर मॅनेजमेंट’ अस्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 7:49 PM
लोकसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांसाठी एक सॉफ्टवेअर दिले.
ठळक मुद्देयादी प्रमुखांना दिले जनसंपर्काचे ‘टार्गेट’ प्रत्येक यादीमागे ३००-४०० मतदानाचे लक्ष्य