शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

राष्ट्रवादीकडून ‘काँग्रेस’ची कोंडी

By admin | Published: March 30, 2015 5:35 AM

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक निवडीवेळी काँग्रेसने कुरघोडी करीत शिवसेनेच्या उमेदवाराला साथ दिली. त्यामुळे शहर, विधी,

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक निवडीवेळी काँग्रेसने कुरघोडी करीत शिवसेनेच्या उमेदवाराला साथ दिली. त्यामुळे शहर, विधी, महिला- बालकल्याण व क्रीडा समिती अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर काँग्रेसला पाणी सोडावे लागणार आहे. यापुढे महापालिकेतील प्रत्येक महत्त्वाच्या विषयांत काँग्रेसची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून मनसेची साथ घेतली जाण्याची शक्यता आहे. महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मात्र, मनसेचा एक सदस्य कमी झाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आहे. मात्र, विविध विषयांवर अनेकदा सत्ताधारी आघाडीत कुरघोडीचे राजकारण सुरू असते. सत्ताधारी आघाडीत एक वर्ष काँग्रेसला स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, यंदाचे चौथ्या वर्षी ते देण्याची मागणी करीत काँग्रेसने उमेदवार उभा केला होता. मात्र, राष्ट्रवादीने मनसेची मदत घेत काँग्रेसची कोंडी केली. त्यामुळे स्थायी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला ऐनवेळी माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे काँग्रेसने पीएमपी संचालक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची कोंडी केली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराऐवजी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सभागृहनेते सुभाष जगताप यांचा पराभव होऊन विजय देशमुख निवडून आले. त्याचा परिणाम विषय समिती सदस्यांच्या निवडीत दिसून आला आहे. महापालिकेत काँग्रेस व मनसेचे संख्याबळ सारखेच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पाठिंबा देईल, त्या पक्षाच्या एका वाढीव सदस्याची निवड विधी, शहर, महिला बालकल्याण व क्रीडा समितीमध्ये होणार होती. मात्र, राष्ट्रवादी पाठिंबा देणार नसल्याचे ग्रहित धरून काँग्रेसने माघार घेतली. त्यामुळे विषय समित्यांमधील १३ सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे ५, मनसेचे ३, काँग्रेस २, भाजपा २ व शिवसेनेचा एक सदस्य आहे. सद्यस्थितीत चार समित्यांपैकी प्रत्येकी दोन समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. मात्र, नव्या समीकरणानुसार उमेदवार उभे करण्यासाठी आवश्यक संख्याबळ काँग्रेसकडे नाही. मंगळवारी विषय समिती अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल होणार आहे. त्या वेळी उमेदवाराला सूचक व अनुमोदक देण्यासाठी तीन सदस्य आवश्यक असतात. मात्र, काँग्रेसकडे दोनच सदस्य आहेत. (प्रतिनिधी)