इंदापूर तालुक्यातील गावागावांत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क व विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इंदापूर तालुक्यात घवघवीत यश मिळाले आहे, अशीही चर्चा तालुक्यात रंगली आहे.
राज्यमंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नेहमीच सर्वसामान्यं माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ताकद दिली आहे. मामांची सामान्य जनतेत मिसळण्याची पद्धत व समाजातील गोरगरीब घटकांना एकत्र करून त्यांची कामे सहज व सोप्या पध्दतीने करण्याची त्यांची प्रतिमा आहे. यामुळेच तालुक्यातील जनतेने मामांवर विश्वास टाकला आहे.
तालुक्यातील ६० पैकी ०३ ग्रामपंचायत बिनविरोध व ५७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली होती. यापैकी ३७ ग्रामपंचायतींवर स्पष्ट बहुमत व तीन ग्रामपंचायतींवर समिश्र राष्ट्रवादी विचाराची सत्ता आणण्यात यश मिळाले आहे.
यामध्ये ४० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी विचाराच्या व २० ग्रामपंचायती विरोधी पक्षाच्या आल्या असल्या, तरी येणा-या काळामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू माणून सर्वच ग्रामपंचायतींना सर्वतोपरी मदत करून शासन स्तरावरून मदत मिळवून गावांचा विकास करण्यास राष्ट्रवादी पक्ष अग्रेसर राहिलेला आहे व आग्रही देखील राहील, अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे-पाटील व कार्याध्यक्ष अतुल (शेठ) झगडे व राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर त्यांच्या सर्व सहका-यांनी त्याच पध्दतीने पक्षावर प्रेम करणा-या सर्व कार्यकर्त्यांनी जे नियोजन केले त्याला चांगल्या पध्दतीचे यश आल्याची माहितीही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दावा केलेली ग्रामपंचायतींची नावे पुढील प्रमाणे, सणसर १७ पैकी १७, लासुरने १७ पैकी १६, भांडगाव ९ पैकी ६, गिरवी ९ पैकी ६, पिंपरी बु. ९ पैकी ६, चाकाटी ७ पैकी ५, काटी १३ पैकी ९, सराफवाडी ९ पैकी ८, शहा महादेवनगर ९ पैकी ५, तरंगवाडी ९ पैकी ९, सपकळवाडी ७ पैकी ७, अंथुने १५ पैकी १२, कळस १५ पैकी १२, कौठळी ९ पैकी ७, बळपुडी ७ पैकी ५, रुई ११ पैकी ११, भरणेवाडी ११ पैकी ११, शेटफळ गढे १३ पैकी १०, निंबोडी ९ पैकी ५, घोरपडवाडी ७ पैकी ४, कुंभारगाव ८ पैकी ५, पोंधवाडी ९ पैकी ९, हागारेवाडी ९ पैकी ९, निमगाव केतकी १७ पैकी १२, कचरवाडी ७ पैकी ७, चिखली ७ पैकी ६, तक्रारवाडी ९ पैकी ७, कडबनवाडी ९ पैकी ६, जाचकवस्ती ११ पैकी ११, सरडेवाडी ११ पैकी ६, व्याहळी ९ पैकी ५, पळसदेव १७ पैकी १२, कळंब १७ पैकी ९, निमसाखर १५ पैकी ८, लोणी देवकर ९ पैकी ५, चांडगाव ७ पैकी ४, पिंपळे ७ पैकी ४ व संमिश्र आलेल्या ग्रामपंचायती जाधववाडी बिनविरोध, कचरवाडी (बावडा) बिनविरोध व भोंडणी ९ पैकी ४ अशा एकूण ३७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दावा केला आहे.
सामान्य जनतेचा कौल राज्यमंत्री भरणे यांनाच
इंदापूर तालुक्यातील जनता खूप हुशार आहे, जनतेला विरोधकांनी साम, दाम, दंड, भेद अशा स्वरूपाची नीती अवलंबली होती, तरीही जनतेने राज्यमंत्री भरणे यांना कौल दिला होता. इंदापूर तालुक्यात २ हजार कोटींपेक्षा अधिकची कामे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून झाले आहेत. त्यामुळे विरोधकांच्याही ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करतील. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाअध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील यांनी व्यक्त केले आहे. ______________________________