पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएचा १३३वा दीक्षांत समारंभ केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेविड आर. सिमेलिएह यांच्या उपस्थितीत एनडीएच्या हबिबुल्ला सभागृहात उत्साहात झाला. यावेळी एनडीएचे कमांडटर एयर मार्शल जसजीत सिंग कलेर आणि विद्यार्थी आणि पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.देशाच्या लष्कर सेवेत वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावण्यासाठी तीन वर्षाच्या खडतर प्रवासानंतर या प्रबोधिनीमधील विद्यार्थी सेवेत रुजू होण्यासाठी सज्ज होतात. तीन वर्षामध्ये त्यांना स्थलसेना, वायुसेना आणि नौसेना या तीनही दलाचे विशेष असे प्रशिक्षण दिले जाते. या वर्षीच्या १३३व्या तुकडीत बॅचलर आॅफ सायन्सचे ५६, बॅचलर आॅफ कॉम्प्युटर सायन्सच्या १४६, बॅचलर आॅफ आर्ट्सचे ४८ अशा एकूण २५० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची पदवी प्रदान करण्यात आली.
एनडीएचा १३३वा दीक्षांत समारंभ पुण्यात उत्साहात; २५० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:12 PM
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएचा १३३वा दीक्षांत समारंभ केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेविड आर. सिमेलिएह यांच्या उपस्थितीत एनडीएच्या हबिबुल्ला सभागृहात उत्साहात झाला.
ठळक मुद्दे एकूण २५० विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची पदवी प्रदानतीन वर्षाच्या खडतर प्रवासानंतर प्रबोधिनीमधील विद्यार्थी सेवेत रुजू होण्यासाठी सज्ज