पुणे : देशसेवेची स्वप्ने घेऊन तीन वर्षांचे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... येणाऱ्या आव्हानांना पेलण्याचा चेहºयावर झळकणारा आत्मविश्वास..लष्करी बँडपथकाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन अशा दिमाखदार वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३७ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा खेत्रपाल परेड ग्राऊंडवर शनिवारी उत्साहात झाला. अतिशय कडाक्याच्या थंडीत झालेल्या या संचलनाने उपस्थित्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.या वेळी सुखोई लढाऊ विमानांनी अधिकारी आणि उपस्थितांना दिलेली सलामी विशेष आकर्षण ठरले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. भावी अधिकाऱ्यांचा गणवेश, त्यांची शिस्त आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत कॅडेट्सनी दिलेली मानवंदना सिंह यांनी स्वीकारली.या वेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी, लेफ्टनंट जनरल सत्येंद्र्रकुमार सिंह, प्रबोधिनीचे कमांडन्ट एअर मार्शल आय. पी. व्हिपीन, डेप्युटी कमांडन्ट रिअर डमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला, विभागप्रमुख आणि प्रशिक्षक उपस्थित होते.संचलनात एकूण २८४ कॅडेट सहभागी झाले होते. यातील १८८ छात्र लष्कराचे, ३८ छात्र नौदलाचे आणि ३७ छात्र हवाईदलातील होते. याशिवाय भूतान, ताजिकीस्तान, मालदिव, व्हिएतनाम, मॉरिशस, अफगानिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार या मित्रदेशांतील २० छात्रांचाही या संचलनात समावेश होता. यावर्षी तिन्ही वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अॅकॅडेमिक कॅडेट कॅप्टन माझी गिरधर याला राष्ट्रपती सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. बटालीयन कॅडेट कॅप्टन कुष्करेजा मिश्रा हा राष्ट्रपती रौप्यपदकाचा मानकरी ठरला. तर बटालीयन कॅडेट कॅप्टन एन. के. विश्वकर्मा हा राष्ट्रपती कांस्यपदकाचा मानकरी ठरला. चिफ आॅफ स्टाफ बॅनरचा मानकरी चॅम्पियन स्कॉड्रन ठरली. सारंग या हेलिकॉप्टरच्या हवेतील चित्तथरारक भराºया हे यंदाच्या दीक्षांत संचलनाचे प्रमुख आकर्षण ठरले.खेड्यातील मुलगा झाला लष्करी अधिकारीजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून शिक्षण घेत लष्कराची कुठलीही पार्श्वभूमी नसताना राहूल लाडने एनडीएत प्रवेश मिळवला. तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून तो नौदलात अधिकारी होणार आहे. राहूल हा अंबड तालुक्यातील महाकाळा या गावचा आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर औरंगाबाद येथील सर्व्हिसेस प्रीपेटरी इन्स्टिट्यूट या विद्यालयात त्यांने प्रवेश घेतला. एनसीसीत प्रवेश घेतल्यामुळे लष्करी जीवन त्याला जवळून अनुभवता आले.
एनडीएचा दीक्षांत सोहळा उत्साहात;देशाच्या सेवेसाठी १३७ वी तुकडी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 5:50 AM