पुणे: भारतीय सीमांचे रक्षण करतांना चीनी सैनिकांना हुसकावून लावतांना झालेल्या चकमकीत कर्नल संतोष बाबू शहीद झाले. शहीद कर्नल संतोष बाबू हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 105 व्या तुकडीचे विद्यार्थी होते. प्रबोधिनीत असतानाही त्यांची ओळख कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय कॅडेट म्हणून ओळख होती. शनिवारी त्यांचे नाव प्रबोधिनितील 'हट ऑ फ रिमेम्बरन्स' या शहीद जवानांच्या स्मारकामध्ये सुवर्ण अक्षरात लिहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर चीनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान शहीद झालेले कर्नल बी. संतोष बाबू यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतर्फे आदरांजली वाहण्यात आली.
प्रबोधिनीच्या परंपरेनुसार, लष्करी कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांचे नाव हट आॅफ रिमेम्बरन्स या शहीद जवानांच्या स्मारकामध्ये असलेल्या पवित्र भितींवर सुवर्णक्षरांनी लिहिले जाते. याच भिंतीवर शहीद कर्नल बाबू यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.कर्नल बाबू हे त्यांच्या शौयार्साठी, कर्तव्य निष्ठेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांचे कार्य प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देईल, अशी भावना प्रबोधिनीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांनी व्यक्त केली.