शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

कलांची हवी जोपासना : मोरेश्वर बुवा जोशी; महाराष्ट्र शाहीर परिषदेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:52 PM

कलांची जोपासना करत असताना एखादी संस्था स्थापन करून ती कला वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकर यांनी केले. 

ठळक मुद्देमहाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शाहिरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळाडॉक्टर, इंजिनिअर झालात तरीदेखील आपल्या कलेचे जतन करा : प्रकाश ढवळे

पुणे : शाहिरी ही खूप मोठी परंपरा आहे. देव, देश, धर्म यांचा वारसा घेऊन हजारो वर्षांची कीर्तनकारांची, संतांची, शाहिरांची परंपरा आहे. देवाचे अभिवादन आणि समाजाचे जागरण या दोन्ही गोष्टी या कलांमधून साधल्या आहेत. सध्या होणारे पाश्चात्यांचे आक्रमण आणि समाजामध्ये असणाऱ्या बुद्धीभेदाला उत्तर देण्याचे सामर्थ्य या सगळ्या परंपरांमध्ये आहे. अशा कलांची जोपासना करत असताना एखादी संस्था स्थापन करून ती कला वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकर यांनी केले. लालमहाल येथे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शाहिरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कीर्तनकार तुकाराममहाराज निंबाळकर, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष आणि शहराध्यक्ष शाहीर प्रकाशदादा ढवळे, गोंधळी बागुजी रेणके, शाहीर हेमंतराजे मावळे उपस्थित होते.  चºहोलीकर म्हणाले, एखाद्या परिस्थितीचा गांभीयार्ने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य पोवाड्यामध्ये आहे. आपल्या कलेतून सामाजिक प्रबोधन घडवण्याचे काम अनेक वर्षे शाहीर करीत आहेत. अशा प्रकारे कलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. देश पारतंत्र्यात असताना शाहिरांनी आपल्या पोवाड्यांमधून जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण केले आहे. त्यामुळे शाहिरांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही.  प्रकाश ढवळे म्हणाले, डॉक्टर, इंजिनिअर झालात तरीदेखील आपल्या कलेचे जतन करा. आपल्या कलेतून संस्कृतीचे दर्शन घडत असते त्यामुळे संस्कृतीचे वारसदार व्हा. गुरुंनी शिकविलेल्या कलेकडे गांभीयार्ने बघा. एखादी कला आत्मसात करण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या करावी लागते. समर्पणाची भावना मनामध्ये असेल तर विद्या प्राप्त होईल. शाहिरी करण्यासाठी प्रतिभाशक्ती, अभिनयकौशल्य, लेखन, स्मरणशक्ती, पाठांतर, भावपूर्ण सादरीकरण हे गुण असावे लागतात. शाहिरी ही शिवाजीमहाराजांची सेवा आहे, त्यामुळे ती केवळ स्नेहसंमेलनापुरती मर्यादित ठेवू नका.ह्ण आदिती कालेकर यांनी सूत्रसंचालन केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणे