शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 6:36 PM

लोकांची मानसिकता बदलणे ही काळाची गरज...

ठळक मुद्देसिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभभाषणाला मराठीतून सुरूवात  

पुणे : ‘निर्भया’ नंतर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत देशातील कायदे अधिक कडक केले. मात्र, तरीही देशात बलात्काराच्या घटना होत आहेत. ही निंदनीय बाब असून या घटना थांबविण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. त्यासाठी शालेय जीवनापासूनच सर्व विद्यार्थ्यांमध्ये चांगले मुल्य रुजविण्याची आवश्यकता असून देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचे, संस्कृतिचे, परंपरांगत चालत आलेल्या चांगल्या गोष्टींचे जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रविवारी केले.लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळाव्या पदवीदान समारंभ प्रसंगी व्यंकय्या नायडू बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, प्र-कुलगुरू तथा विद्यापीठाच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित होते. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. तसेच विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक पदवी प्रदान केले.व्यंकय्या नायडू म्हणाले, आपल्या आई-वडिलांचा ,गुरूंजणांचा, वडीलधाऱ्यांचा, ज्येष्ठांचा व आपल्या बहिणींचा आदर ठेवण्याबाबत मुलांना लहानपनापासून शिकवले पाहिजे. समाजात गुरूचे स्थान महत्त्वाचे असून शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविला पाहिजे. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते.जीवनात निर्माण झालेल्या आव्हानांकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. तसेच समाजातील राक्षसांना संपवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व प्रशासकीय कौशल्यांची आवश्यकता आहे. लोकांची मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपल्या संस्कृती आणि इतिहासाचा आधार घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांनी मनोगत व्यक्त केले. --विद्यापीठांच्या क्रमवारीत वाढ व्हावी...इंग्रज अधिकारी मेकॉले याने देशाला दिलेल्या शिक्षण पध्दतीत बदल करणे गरजेचे आहे. त्यातच देशाचा इतिहास चूकीच्या पध्दतीने लिहिला असून खरा इतिहास समाजपर्यंत पोहचत नाही, अशी खंत व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली. तसेच जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत पहिल्या ३०० मध्ये भारतातील एकही विद्यापीठ येत नाही. परंतु, त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले पाहिजे. मात्र, आपल्या आई-वडिलासाठी, समाजासाठी, मातृभूमिच्या सेवेसाठी परत आले पाहिजे, असेही व्यंकय्या नायडू म्हणाले.........भाषणाला मराठीतून सुरूवात  व्यंकय्या नायडू यांनी पदवी प्रदान समारंभ प्रसंगी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सिंबायोसिसचा गौरव करताना व्यंकय्या नाडू म्हणाले, सध्या ‘वसुधैव कुटुंबकम’चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी सिंबायोसिसमध्ये शिक्षणासाठी येत आहेत, ही गौरवाची बाब आहे.

टॅग्स :Puneपुणेsymbiosisसिंबायोसिस