गतकालीन/ समकालीन व्यक्ती, घटना किंवा प्रसंग यात दडलेल्या विसंगत स्वरूपाच्या सूचित अर्थांचे मार्मिक आविष्कारातून रंजन करण्याची हातोटी व्यगंचित्रकारांकडे असते. कोरोना काळातही आपल्या अर्थपूर्ण व्यंगचित्रांद्वारे रसिकांच्या ओठावर हास्य फुलविण्याची जबाबदारी व्यंगचित्रकार पार पाडत आहेत. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने गेल्या पाच दशकांहून अधिककाळ वाचकांना हसविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांच्याशी 'लोकमत' ने संवाद साधला. सध्याच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांच्या भावना दुखावतात. त्यासाठी निकोप दृष्टी निर्माण होण्याची गरजअसून, चित्रसाक्षरता महत्वाची आहे, असे मत त्यांनी नोंदविले.--------------------------------------------------------------------------------------------नम्रता फडणीस* एक काळ असा होता की वृत्तपत्र, मासिकांमध्ये व्यंगचित्रांना प्रामुख्याने स्थान होते. मात्र आज माध्यमांमधून व्यगंचित्र काहीशी हद्द पार झाली आहेत. या स्थितीकडे तुम्ही कसे पाहाता?- वृत्तपत्र किंवा इतर तत्सम माध्यमांमध्ये व्यंगचित्रांना स्थान उरलेले नाही. यात काही अंशी तथ्य असलं तरी नवीन माध्यमं समोर येत आहेत.संमेलनांमध्ये व्यंगचित्र प्रदर्शनं किंवा मेळाव्यांना नव्या पिढीचाउत्तम प्रतिसाद मिळतोय. आता अभिव्यक्तीच माध्यमही बदललयं. सोशल मीडियावरव्यंगचित्रकार मोठ्या प्रमाणावर व्यंगचित्रं प्रसिद्ध करीत आहेत.* या नव्या माध्यमाबददलचं तुमचं निरीक्षण काय?-जी माध्यमं जन्माला येतात. ती स्वत:च स्थान घेऊन येतात. त्याचही स्वागत करायला हवं. पण ते कशा पद्धतीने स्वीकारल पाहिजे हे शेवटीमाध्यमकतर््यांच्या हातात आहे. हे माध्यम मुक्त असल्याने काही अनिष्टगोष्टी येऊ शकतात. ज्या तुम्हाला थांबवता येऊ शकत नाही. वृत्तपत्रामध्येकसे तुम्हाला जबाबदार धरता येऊ शकते. नव्या पिढीने या माध्यमाचाजबाबदारीने उपयोग केला पाहिजे.* नव्या युगात व्यंगचित्राची भाषा बदलली आहे का?-पूर्वीच्या काळी मी व्यक्तिश: व्यंगचित्रांसाठी शब्दांचा वापर खूप कमी करीत असे. मात्र वर्तमान काळात शब्द माध्यमातूनही व्यंगचित्रं रेखाटली जात आहेत. दोन्हीचेही स्वागत करायला पाहिजे. परंतु एक आहे की शब्दविरहित व्यंगचित्र असतं तेव्हा त्याचा कँनव्हासही खूप मोठा असतो. प्रादेशिक भाषांमधले देखील त्याचा आस्वाद घेतला जाऊ शकतो. म्हणूनच आजही आंध्र प्रदेश, तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये छोट्या छोट्या मासिकांनी शब्दविरहित व्यंगचित्रांची परंपरा जपली आहे.* नवोदितांनी व्यगंचित्रे साकारताना कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे?-व्यगंचित्रांची भाषा, त्याचे व्याकरण आत्मसात केले पाहिजे. मगचंकल्पनेला चित्ररूप द्यायला हकं. आपल्याला नक्की काय म्हणायचयं याचा अर्थबोध समोरच्याला समजला पाहिजे. जे शब्दातून व्यक्त होत नाही ते प्रभावीपणेचित्रांमधून मांडता आले पाहिजे. त्यासाठी सामाजिक घडामोडींचे निरीक्षणउत्तमप्रकारे करता आलं पाहिजे.* सध्याचे देशातील वातावरण व्यगंचित्रकारांसाठी पोषक आहे का? व्यंगचित्रकारांपुढची आव्हाने काय वाटतात?-पंडित नेहरूंच्या काळात व्यंगचित्रकार शंकर यांची चित्रे अत्यंत तिखट असायची. त्यावर निषेध नोंदविले गेले. नाराजीही व्यक्त झाली. मात्र तेकुणी बंद केले नाही. मात्र सध्याचा काळ असा नाही. कुणाच्या तरी लगेचभावना दुखावल्या जातात. निकोप दृष्टीकोन बाळगण्याची गरज आहे. त्यासाठीचित्र साक्षरता निर्माण व्हायला हवी. केवळ व्यंगचित्र म्हणजे राजकीय असंनाहीये. करमणूक, शैक्षणिक, विचारप्रवाहासाठी म्हणून देखील व्यंगचित्र हेमाध्यमं उपयुक्त आहे. ते जतन केले पाहिजे.----------------------------------------------------
व्यंगचित्रांकडे पाहण्याची निकोप दृष्टी निर्माण होण्याची गरज : शि.द फडणीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 5:41 PM
सध्याच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांच्या भावना दुखावतात. त्यासाठी निकोप दृष्टी निर्माण होण्याची गरजअसून, चित्रसाक्षरता महत्वाची आहे.
ठळक मुद्देपाच दशकांहून अधिककाळ वाचकांना हसविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांच्याशी संवाद