लोणी काळभोर येथील जीवन शिक्षण विद्या मंदिराच्या ( जिल्हा परिषद मराठी शाळा ) १९८० सालच्या इयत्ता चौथी व पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कुलच्या १९८६ सालच्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी दिड लाख रुपये खर्च करून या दोन्ही शाळेत प्रत्येकी एक असे दोन डिजिटल वर्ग बनवून दिले आहेत.
कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, शिक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष सुभाष काळभोर, प्राचार्य एस एम गवळी, सावंत सर, केंद्र प्रमुख रोहिदास मेमाणे, , हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर, या बॅचचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांच्या तत्कालीन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी सुभाष काळभोर, तत्कालीन शिक्षक खोत , पोमण , माने , नदाफ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मधुकर कुमावत यांनी तर सूत्रसंचालन कल्पना मुळे बोरकर यांनी केले.आभार सूर्यकांत गवळी यांनी मानले.
लोणी काळभोर - माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना कल्याणराव विधाते.