पुणे : समाजामध्ये आज अनेक संस्था अर्थ, शिक्षण व समाजासाठी सातत्याने कार्यरत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, शिक्षण वा सामाजिक कार्य असो या कामामध्ये धाडस, प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा असणे आवश्यक आहे, असे मत पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू एन. एस. उमराणी यांनी व्यक्त केले. सोलापूर डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरभूषण व पुणेरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, माजी पोलीस अधिकारी शहाजीराव पाटील, विठ्ठल जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अभिनेत्री दीपाली सय्यद, करिश्मा वाबळे, रामभाऊ जगदाळे, प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर उपस्थित होते. एन. एस. उमराणी यांना सोलापूर कर्मयोगी पुरस्काराने गौरविले. तसेच ॠतुजा भोसले, जगन्नाथ चटे, झुबरेपा काझी, प्रतीक चिंदरकर, अभिनेत्री रोहिणी माने, हरीश गुळीग, मंजूषा काटकर यांना सोलापूरभूषण पुरस्काराने गौरविले.पुणेरत्न पुरस्काराने अभय येतावडेकर, राज काझी, एम. ए. हुसेन, जगन्नाथ लडकत, अनिल गुंजाळ, अर्जुन सालेकर, डॉ. राजन पाटील, दत्तात्रय शिंदे, संगीता पुणेकर, धनंजय कोकणे, गणेश जगताप, दीपाली सय्यद, गोवर्धन दोलताडे, संध्या सोनावणे आणि योगेश कदम यांना गौरविले. संतोष चोरडिया आणि कविता गीया यांनी सूत्रसंचालन केले.
समाजकार्यात प्रामाणिकपणा गरजेचा : एन. एस. उमराणी : सोलापूरभूषण व पुणेरत्न पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:01 PM
सोलापूर डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरभूषण व पुणेरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले.
ठळक मुद्देकामामध्ये धाडस, प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा असणे आवश्यक : एन. एस. उमराणीसोलापूरभूषण व पुणेरत्न पुरस्कार वितरण सोहळा