शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

पत्रकारिता समाजहितासाठी हवी

By admin | Published: April 26, 2015 1:24 AM

‘पत्रकारिता ही समाजहिताची असावी. समाजातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम लेखणीतून झाले पाहिजे.

पुणे : ‘‘पत्रकारिता ही समाजहिताची असावी. समाजातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम लेखणीतून झाले पाहिजे. ध्येयवादी पत्रकारिता करणाऱ्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देऊन त्यांना समाजासमोर आणण्याची अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली. तसेच, वृत्तपत्राचे स्वरूप काळानुरूप बदलत असून, ते आत्मसात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले. वरुणराज भिडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित वरुणराज भिडे पुरस्कार वितरणाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या वेळी ‘लोकमत’चे बातमीदार-उपसंपादक सुनील राऊत यांचा वरुणराज भिडे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, गुरुबाल माळी व सरिता कौशिक यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. समीर वैरागी व शिल्पा पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विलास जोशी, अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई व शैलेश गुजर उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘पत्रकारिता ही समाजहिताचीच असली पाहिजे. कालपरत्वे वृत्तपत्रांमध्ये कमालीचे बदल झालेले आहेत. पहिल्या पानावर ज्या दिवसभरातल्या घडामोंडीवर आधारित ठळक बातमी दिसली पाहिजे ती दिसत नाही. हे बदल आत्मसात करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच, अशा बदलांना सामोरे जाण्याची शक्ती मिळेल.’’ (प्रतिनिधी)नव्या लोकांनाही मार्गदर्शन करा......४उल्हास पवार यांनी १९६७मध्ये शरद पवार यांना निवडणुकीमध्ये मदत केली होती म्हणून ते निवडून आले होते, असा चिमटा पवारांना काढला. यावर उदय निरगुडकर यांनी २०१४मध्ये जर अशीच मदत केली असती, तर अशी परिस्थिती उद्भवली असती का? अशी टिप्पणी उल्हास पवारांना उद्देशून केली, त्यावर ऐकून घेतील ते शरद पवार कसले! त्यांनीही मग आता निवडणुकीत नव्या लोकांना सहकार्य करावे, तसेही आता ’ते’ रिकामेच आहे, अशा शब्दांत उल्हास पवारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. निवडणुकीत कसा आलो..? पवारांनी केला गौप्यस्फोट४राजकारणात येण्यामागचे महत्त्वाचे कारण कोणते असेल? ते म्हणजे ’दूध’, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. सकाळी उठून चहा आवडत नसल्यामुळे दूध प्यावे लागायचे. ते प्यावे लागू नये म्हणून लवकर बाहेर पडायचो. त्यातून सवंगडी जमत गेले. ज्या वेळी १९६७मध्ये पहिली निवडणूक लढविली, त्या वेळी मत मागण्यासाठी लोकांच्या दारी जायचो. महिला चहाचा कप आणून द्यायच्या; पण चहा प१त नसल्याने ‘नको’ म्हणत असे. त्यावर आमच्या हातचा चहा पीत नाही तर आमच्यासाठी काय काम करणार? असे तोंडावर महिला सुनवायच्या. राजकारणात आल्यावर सवयी बदलल्या; पण त्यानंतर कधी कुणाच्या दारावर मतं मागायला गेलो नाही, असे पवारांनी सांगितले.