नारायणगाव येथील कृषि विज्ञान केंद्र येथे महाराष्ट्र राज्य सिताफळ बागायतदार संघाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना विजय कोलते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर हे होते. यावेळी माऊली मेमाणे, शांताराम पोमण , सभापती माजी वसंत भालेराव, अमित बेनके, रंगदास स्वामी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोरा, उद्यानविद्या शास्त्रज्ञ भरत टेमकर हे उपस्थित होते.
अनिल मेहेर म्हणाले यांनी कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार सिताफळांच्या जातींची शेतकर्यांनी लागवड करावी असे मार्गदर्शन केले.
शेती क्षेत्रामध्ये तरुण पिढीने आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून कृषि उत्पन्नामध्ये वाढ करावी असे विचार अमित बेनके यांनी आवाहन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सिताफळ संघाचे माऊली मेमाणे यांनी संघाच्या वाटचालीबाबत शेतकर्यांना माहिती दिली.
यावेळी पांडुरंग फळबाग नर्सरी आणेचे प्रदिप आहेर यांची पुणे जिल्हा सिताफळ संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी , शांताराम पोमण यांची उपाध्यक्षपदी तर पुरंदर तालुका सिताफळ संघाच्या अध्यक्षपदी निलेश काळे यांची निवड करण्यात आली.
०७ नारायणगाव
प्रदिप आहेर यांची पुणे जिल्हा सिताफळ संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना कृषिरत्न अनिल मेहेर, विजय कोलते आणि इतर.