रांजणगाव सांडस : भीमा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूचोरांनी उच्छाद मांडला असून, पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. पारगाव (ता. दौंड) येथील बंधाऱ्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू आहे.शिरूर तालुक्याला भीमा नदीची मोठ्या प्रमाणात किनारपट्टी लाभली आहे. या नदीच्या गावांना या नदीच्या पट्ट्याला मुबलक पाणी बारमाही उपलब्ध असते. या नदीकाठावरील गावांतील वाळूचोरांनी दिवसरात्र वाळू काढून नदीपात्रात मोठमोठे खड्डे पाडले आहेत. जून-जुलैमध्ये बंधाºयाच्या पाणी अडविणाºया प्लेट काढल्या जातात; परंतु या वर्षी पाऊस ग्रामीण भागात न पडल्याने तसेच धरणक्षेत्रात पाऊस पडून धरणे भरून पाणी नदीपात्रातून उजनी धरणात सोडण्यात आले. अनेक दिवसांपासून पावसाच्या सरी न पडल्याने नदीपात्रातील पाणी पातळी कमी होऊन नदीपात्र रिकामे पडले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील वाळू उघडी पडली आहे. याच वाळूचा चोरांनी मोठ्या प्रमाणात उपसा चालू केलेला आहे.पारगाव (ता. दौंड) येथील बंधाºयाजवळील भागात दिवसरात्र वाळूउपसा चालू असल्याने भविष्यात हा बंधारा पडतो की काय, अशी भीती निर्माण झालेली आहे. वाळूउपसा हा शिरूर-सातारा या मुख्य रस्त्यावरून महसूल विभागाच्या डोळ्यांत ‘अंजन’ घालणारा आहे. या भागात वाळू ही यारीच्या साह्याने काढली जात आहे.
वाळूचोरांच्या उच्छादाला आळ घालण्याची गरज, कारवाई आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 1:24 AM