पुणे : पुण्याच्या योग्य विकासासाठी मेट्रो; तसेच शारीरिक, मानसिक फिटनेससाठी धावणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड; तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉनमध्ये आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले आहे.‘लोकमत’तर्फे व्हीटीपी रिअॅलिटी प्रस्तुत महामॅरेथॉन १७ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आली आहे. माणिकचंद आॅक्सिरिच आणि सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी) यांच्या सहयोगाने ही मॅरेथॉन होणार आहे.‘लोकमत’शी संवाद साधताना बापट म्हणाले, ‘‘आरोग्यशास्त्रात धावण्याला फार महत्त्व आहे. निरोगी आणि आनंदी जीवन जगू इच्छिणाऱ्या सर्वांनी नियमितपणे धावण्याचा व्यायाम करायला हवा. इतर व्यायामप्रकारांच्या तुलनेत धावणे हे कमी खर्चिक, पण फायदेशीर आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’ ही पुणेकरांसाठी चांगली संधी आहे. ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे या स्पर्धेचे घोषवाक्य आहे. सर्व पुणेकरांचेही हेच ध्येय आहे. त्यामुळे सर्व पुणेकरांनी या शर्यतीच्या माध्यमातून एकत्रित धावण्याचा आनंद लुटावा. मीदेखील ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहे, तुम्हीही नक्की सहभागी व्हा.’’
फिटनेससाठी धावणे आवश्यक - गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 2:12 AM